कैलास मानसरोवर येथे अडकलेल्या सर्व भाविकांची सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |

 
 
पीठाडोंगरा (उत्तराखंड) :  कैलास मानसरोवरच्या सात्रेला गेलेले भाविक गुंजी येथे अडकले असताना अखेर त्यांची सुटका करण्यात आली असून त्यांना पीठाडोंगरा येथे हॅलिकॉप्टरच्या मदतीने पाठविण्यात आले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. "भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टर्सच्या मदतीने या भाविकांची सुटका करण्यात आली आहे, याविषयी मला आनंद आहे." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
कैलास मानसरोवरच्या यात्रेसाठी देशातून गेलेले ११५ भाविक उत्तराखंडमध्ये अडकून पडले होते. उत्तराखंडच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील खराब वातारणामुळे हे सर्व भाविक पर्वतीय भागामध्ये अडकून पडले असून भारत सरकार या सर्व भाविकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होती, अखेर भारतीय वायुसेनेला यामध्ये यश मिळाले असून या भाविकांची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला देखील कैलास-मानसरोवर यात्राला गेले १५०० भाविक नेपाळ-तिबेट भागामध्ये अडकून पडले होते. यावेळी देखील भारत सरकारने नेपाळच्या मदतीने या सर्व भाविकांची सुखरूप सुटका केली होती.
@@AUTHORINFO_V1@@