सरकारने आरक्षण दिले मात्र न्यायालयाने स्थगिती दिली : विनोद तावडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली, अशी माहिती मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे सदस्य आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांनी केवळ आपल्या परिवाराची खळगी भरली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते.
 
मराठा आरक्षणा या मुद्याचा राजकीय वापर होतोय का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता काही ठिकाणी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होतही आहे. पण, समाजाला माहित आहे, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मराठा बांधवांना वेठीस धरून राजकारणाचा प्रयत्न करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले, त्यांनी कधीच समाजाचे हित पाहिले नाही, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. सर्व अभ्यासक्रमात ८ लाख रुपायांखाली वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे या मुद्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला तरी हा समाज आता सुजाण आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले असल्याचे सांगून तावडे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने उद्या बंद घोषित केला आहे. यादरम्यान शाळा आणि महाविद्यालये सुरू ठेवावीत की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि स्थायिक पोलिसांनी घ्यायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@