अमरनाथ यात्रेत पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
अमरनाथ : बालटाल मार्गावर कालपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने सध्या अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. जोरदार आणि सारखा पाऊस या भागात सुरु असल्याने घाटाच्या भागामध्ये चिखल आणि पाणी साचले असल्याने घसरायची शक्यता असल्याने ही यात्रा सध्या थांबवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या आठाड्यात देखील मुसळधार पावसामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 
 
 
दरम्यान बालटाल येथील मार्गवर काल दरड कोसळल्यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. बालटालपासून काही अंतरावर घाटमार्गावर काल दरड कोसळली होती. यानंतर ही दरड स्वच्छ करेपर्यंत हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर आज पहलगामचा मार्ग देखील बंद करण्यात आल्यामुळे भाविकांना अमरनाथ दर्शनासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@