मुंबई, ठाणे, पालघर नवी मुंबई येथे उद्या बंद, मराठा आंदोलकांची भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई : काल मुंबई येथे काका शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. सर्व मराठा आंदोलकांनी उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई येथे बंद पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे. आज मराठा क्रांती मोर्चा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (मंगळवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यानंतर आता उद्या मुंबई, नवी मुंबईसह ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
 
 
 
 
 
कालच्या घटनेनंतर राज्यभरात हिंसक आंदोलन करण्यात येत आहेत. आरक्षणाच्या मागणी बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलकांच्याकडून जोर धरत आहे. दादरच्या शिवाजी मंदीर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्ययकांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई सनन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत बंदची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. मुंबईत एक सायकलही चालू देणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. उद्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारही बंद राहणार आहेत. उद्याचा बंद हा शातंतेत पार पडावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र उद्याचे आंदोलन शांततेत चालणारे शेवटचे आंदोलन आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा, दूध दुकाने, शाळा, कॉलेज, स्कूलबस सुरु असतील अशी माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे सरकारवर सतत दबाव बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
 
आतापर्यंत सरकारच्या अनेक आवाहनांना मराठा क्रांती मोर्चाने साथ दिली आहे. सरकारनेही मराठा समाजाचा योग्य सन्मान करावा. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आगामी काळातील ७२ हजार पदांच्या निवडीची प्रक्रिया आरक्षण मिळेपर्यंत थांबवावी अशी मागणीही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.
@@AUTHORINFO_V1@@