कॅनडामध्ये माथेफिरूचा गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |

एका महिलेचा मृत्यू, १४ जण जखमी



टोराँटो : दक्षिण कॅनडातील टोराँटो शहरामध्ये आज एका माथेफिरूने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर अंदाधुंदी गोळीबार केल्याच्या घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण गंभीररित्या जखमी झाले असून गोळीबार करणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी ठार केले आहे. तसेच जखमी नागरिकांना उपचारासाठी जवळील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.


टोराँटो येथील इस्ट यॉर्क याठिकाणी ही घटना घडली आहे. इस्ट यॉर्कमधील डॅनफोर्ट येथे काही नागरिक रस्त्यावरून फिरत असताना एक माथेफिरू हातामध्ये बंदूक घेऊन याठिकाणी आला. यानंतर त्याने रस्त्यावरून चालत असलेल्या नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक महिलाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य १४ जण जखमी झाले. यानंतर घटनेची माहिती मिळताच टोराँटो पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी पोलिसांवर देखील गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस आणि माथेफिरूमध्ये झालेल्या चकमकीमध्ये संबंधित आरोपीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या माथेफिरूने केलेली गोळीबाराचा कारण मात्र अद्याप समोर आले नसून टोराँटो पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.



@@AUTHORINFO_V1@@