महिला स्पेशल लोकलसाठी ‘स्वाक्षरी मोहीम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |


 


बदलापूर : बदलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी गर्दीच्यावेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काल स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

 

बदलापूरची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी महिलांना प्रवासात होणारा त्रास लक्षात घेता बदलापूर येथून सकाळच्या वेळेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दिशेने आणि संध्याकाळच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूरच्या दिशेने महिलांसाठी विशेष लोकल सुरू करावी, या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

महिला प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या रेल्वेमंत्र्यांपर्यंत आणि डीआरएमपर्यंत पोहोचविण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केल्याचे शहरप्रमुखांनी सांगितले. याशिवाय बदलापूर रेल्वे स्थानकावर फलाट एक आणि दोनवर स्वच्छतागृह नाही, त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. तसेच याच फलाटावर निवारा शेड नाही. त्यामुळे महिलांना पुलाच्या पायर्यांवर उभे राहावे लागते. याठिकाणी शेड उभारावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस सह्यांची मोहीम सुरू राहणार असून जास्तीत जास्त बदलापुरातील रेल्वे प्रवाशांनी आपली स्वाक्षरी करून बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी निवेदनावर सही करण्याचे आवाहन शहरप्रमुखांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@