सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ’इनोव्हेटिव्ह टीचिंग फॉर मॅनेजमेंट टीचर्स’ उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ’फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’कडून नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दोन नावीन्यपूर्ण विकास कार्यक्रमांचे उद्घाटन मा. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. "इनोव्हेटिव्ह टीचिंग फॉर मॅनेजमेंट टीचर्स” आणि ’इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी’ असे हे दोन कार्यक्रम असून या कार्यक्रमांसाठी केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या पंडित मदनमोहन मालवीय राष्ट्रीय योजनेंतर्गत अनुदान मिळाले आहे. हे दोन्ही कार्यक्रम सात दिवसांच्या कालावधीसाठी असणार आहेत. देशभरातील ४० हून अधिक शिक्षकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे.
 
"इनोव्हेटिव्ह टीचिंग फॉर मॅनेजमेंट टीचर्स” या कार्यक्रमामध्ये पारंपारिक फळा व खडू सोडून अधिक प्रभावीपणे कशा पद्धतीने अध्यापन कसे करता येईल, या संकल्पनेवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर, ’इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी’ या कार्यक्रमामध्ये माहितीच्या या युगात स्वत:ची माहिती (डेटा) सुरक्षित कशा प्रकारे ठेवता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमास विद्यापीठ अनुदान आयोग- मानव संसाधन विकास केंद्राचे संचालक प्रा. संजीव सोनावणे, ’इनोव्हेटिव्ह टीचिंग फॉर मॅनेजमेंट टीचर्स’ कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन सुर्वे, ’इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी’ या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध जोशी हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
 
"केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत ’फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’ आणि "टीचिंग लर्निंग सेंटर’ या दोन्हीसाठी अनुदान मिळालेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. विद्यापीठे ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असतात आणि या ध्येयाच्या पूर्ततेसाठी अध्यापकांचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत मा. कुलगुरु यांनी उद्घाट्नाच्या कार्यक्रमावेळी मांडले. याचबरोबर, या कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी ’फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’चे अभिनंदनही केले.
 
@@AUTHORINFO_V1@@