आजपासून नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांच्या दौऱ्यावर ते आजपासून जाणार आहेत. १० व्या ब्रिक्स संमेलनासाठी ते या देशांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पाच दिवसांच्या या दौऱ्यात नरेंद्र मोदी आफ्रिकी देशांच्या प्रमुख नेत्यांशी आणि उद्योजकांची भेट घेणार आहेत.
 
 
या दौऱ्यात ते प्रथम रवांडा या देशाला भेट देणार असून हा त्यांचा पहिला रवांडा दौरा असणार आहे. भारत ने रवांडाला बऱ्याच क्षेत्रात मदत केली आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण या क्षेत्रांत भारताने रवांडाला ४० कोटी डॉलर एवढी रक्कम मदत म्हणून दिली आहे. भारताचा हा ऐतिहासिक दौरा असणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी युगांडा या देशाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. 
 
 
भविष्यकाळात हे संबंध भारताला उपयोगी पडणार असल्याने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. युगांडामध्ये एका व्यापार महोत्सवात ते यावेळी भाग घेणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी युगांडाच्या संसदेला संबोधित देखील करतील. नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असणार जे युगांडाच्या संसदेत आपले भाषण देणार आहेत. यावेळी ते युगांडामध्ये राहत असलेल्या भारतीय समुदायाला देखील संबोधित करणार आहेत. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@