चैतन्यशक्ती भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |


 

चैतन्यशक्तीबद्दल आपण माहिती घेत आहेत. चैतन्यशक्तीचा सिद्धांत मांडताना डॉ. हॅनेमान यांनी या चैतन्यशक्तीचे काही गुणधर्मही विस्ताराने सांगितले आहेत. आज आपण पुढील गुणधर्म पाहाणार आहोत.

‘स्वशक्तीमान’ गुणधर्म

चैतन्यशक्तीला कोणी ऊर्जा पुरवत नाही, तर ती स्वत:च शक्तिमान असते. आपल्या शरीर व मनावर सर्वोच्च अधिकार हा या चैतन्यशक्तीचा असतो. चैतन्यशक्तीला कुठलेही बंधन नसते, उलट ही चैतन्यशक्तीच शरीर व मनाला व्यवस्थित बांधून ठेवते. म्हणूनच हिला ‘स्वशक्तीमान’ (autocratic) असे म्हटले जाते.

‘स्वयंचलित’ गुणधर्म

चैतन्यशक्ती तिचे संचालन स्वत:च करते. ही ऊर्जा स्वयंचलित असते. माणसाच्या चैतन्याला ऊर्जा जोडणी नसते. शरीरातील पेशींच्या साहय्याने व सौरऊर्जा, पाणी व अन्न यांच्या साहय्याने चैतन्यशक्ती स्वत:च शरीराची ऊर्जा निर्माण करते. शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये ही ऊर्जा बनत असते. प्रत्येक पेशींमध्ये ‘मायटोकॉन्ट्रीया’ नावाचे एक साधन असते. त्याच्या मदतीने प्रत्येक पेशी ऊर्जा तयार करत असते. त्याला ‘ATP’ (अ‍ॅडीनोसिन ट्रायफॉस्फेट) असे म्हटले जाते.

माणसावर होणार्या आंतरीक व बाह्य उत्तेजनांच्या अनुसार ही चैतन्यशक्ती स्वत:च कार्य करत असते व त्यानुसार शरीर व मनाला अनुकूल बनवत असते.

गतिशिलता

चैतन्यशक्तीचा अजून एक गुणधर्म आहे आणि तो म्हणजे गतिशिलता (dynamic nature) म्हणजेच सतत कार्यरत व गतिशील असणे. हा या चैतन्यशक्तीचा नैसर्गिक गुण आहे. चैतन्यशक्ती कार्यरुप नसेल, तर माणसाचे सर्व अवयव ठप्प होतील. पेशींमध्ये ऊर्जा बनणारच नाही. माणसाचे शरीर व मन काम करणार नाही. म्हणूनच या चैतन्यशक्तीला गतिशील राहवेच लागते.चैतन्यशक्तीला स्वतःची बुद्धी व विचारप्रक्रिया नसते. तसेच तो स्वप्रेरणादायी असते.

 

बुद्धी ही सारासार विचार करते, तर तमभाव बुद्धीला कळतो. परंतु, चैतन्यशक्ती ही केवळ एक ऊर्जा असल्यामुळे तिला स्वत:ची विचारशक्ती नसते; ती केवळ एक ऊर्जा व शक्तीच्या रूपात कार्यरत असते. ही ऊर्जा एका विशिष्ट साच्यात क्रियाशील असते. पण, हा साचा ती स्वतःहून बदलू शकत नाही किंवा परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकत नाही. प्रत्येक शरीरावर असणारी ही चैतन्यशक्ती त्या त्या शरीराच्या जडणघडणीनुसार कार्य करत असते आणि त्यात कुठलाही तमभाव किंवा विशेषज्ञान नसावे. कुठलीही ऊर्जा ही स्वयंप्रेरणादायी असली तरी ऊर्जेमध्ये कुठलीही निर्णय क्षमता नसते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत ती कुठलाही निर्णय घेऊन बदलू शकत नाही. जसे वापरले जाऊ तशी ही ऊर्जा वापरली जाते. माणूस आपल्या मनाने व शरीराने जी कर्मे करतो, ती कर्मे ही ऊर्जा वापरतात. चैतन्यशक्ती माणसाच्या कर्मांना थोपवू शकत नाही. जसे अणुशक्ती किंवा आण्विक ऊर्जा ही केवळ एक ऊर्जा आहे व माणूस आपल्या कर्माने तिचा माणसांच्या विकासासाठी पण वापर करू शकतो व संहारासाठीही वापर करू शकतो. ऊर्जा यात निर्णय घेऊ शकत नाही. माणसाची बुद्धीच या ऊर्जेचा वापर करते. यामुळे या एकाच बाबतीत चैतन्यशक्ती ही कमकुवत असते. कारण, माणसाची बुद्धी व कर्मानुसार तिला चालावे लागते. उदा. एखादा माणूस जर व्यसनी असेल, तर ही चैतन्यशक्ती हे व्यसन सोडवू शकत नाही. ती फक्त व्यसनी माणसाच्या कर्मांना प्रतिसाद देत असते व व्यसनी माणसाच्या कर्मांमुळे मग ती खालावत जाते व त्या माणसाला रोग होतो. असो. पुढील भागात ही चैतन्यशक्ती कशी कार्य करते, ते आपण पाहूया...

 
 
-डॉ. मंदार पाटकर 
@@AUTHORINFO_V1@@