माणूस म्हणून माणसाशी जोडणारे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018   
Total Views |



अठराविश्व दारिद्र्यातही संस्कारांची कास न सोडता अपार मेहनतीच्या जोरावर स्वत:चे आयुष्य बदलवणारे प्रकाश करमरकर. त्यांचे आयुष्य लाखो लोकांसारखे सामान्य असेल, पण त्यातला मानवी ध्येयवाद असामान्यच...

तूम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पीएच.डी. करता का? अहो, संघ आता औषधाला तरी उरलाय का? काहीही, विषय बदला.गोष्ट होती १९७८ सालातली. एका मोठ्या वाचक चळवळीच्या प्रणेत्याने प्रकाश करमरकर यांना सल्ला दिला. तिथल्या चारचौघांनी विषय रंगवले की, ‘हो ना! आणीबाणी आणि त्यानंतर पडलेलं सरकार, आता रा. स्व. संघ काही उठत नाही. संपलं सगळं.प्रकाश करमरकर शांतपणे एकत होते. मात्र, इतक्यात हे सर्व संभाषण ऐकणार्या एका माणसाने मध्येच उसळून म्हटले,’साहेब, तुम्ही चुकीचं म्हणता. अहो, रा. स्व. संघ संपला नाही. उलट, आता तर आमच्या वस्त्यांमध्येही शाखा भरते आहे. संघ आता सगळ्या समाजामध्ये ठसा उमटवत चालला आहे.त्या माणसाचे ते बोलणे त्या वाचक चळवळीच्या प्रणेत्यास अर्थातच रूचले नाही. पण, प्रकाश करमरकरांनी मात्र ठरवले की, आपण रा. स्व. संघाचा इतिहास आणि महाराष्ट्रातले कार्य या विषयावरच पीएच.डी करायची.

त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. चिकाटीने आणि दीर्घ प्रयत्नांनी प्रकाश करमकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघया विषयावरची पीएच.डी १९९५ साली पूर्ण केली. प्रदीर्घ कालावधी लागला. या कालावधीत प्रकाश यांना भरपूर अनुभव आले. पण, त्याबाबत सांगताना प्रकाश म्हणतात, ‘पीएच.डी केली हे काही माझे मोठे कर्तृत्व नाही. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी वास्तव लोकांसमोर यावे, हा माझा विचार प्रत्यक्षात आला याचे मला समाधान वाटते.

अगणित लोक पीएच.डी करत असतात. त्या पार्श्वभूमीवर एम.ए, पीएच.डी, एम.लिब (लायब्ररी सायन्स), एस.सी असे उच्चशिक्षिण घेणार्या प्रकाश करमरकरांचे इतके अप्रुप का? तर ते अप्रुप यासाठी की, प्रकाश करमरकर हे जातीय समीकरणाच्या आराखड्यात आहे रेगटातले. घरी सरस्वतीचा निवास असला तरी लक्ष्मीचे दुरूनही दर्शन नव्हते. प्रकाश मूळ रत्नागिरीचे. आईवडील आणि सहा भावंडं. वडील भिक्षुकी करायचे. घरात अठरा विश्वे दारिद्य. त्यामुळे प्रकाश यांना गावात वार लावून जेवावे लागे. दारिद्याच्या संगतीने येणार्या अनेक समस्यांनी करमरकर कुटुंब गांजलेले. पण, याही परिस्थितीत करमरकर दाम्पत्य मुलांवर चांगले संस्कार कसे होतील, याची दक्षता घेई. याच दरम्यान प्रकाश यांच्या गावात संघाची शाखा भरू लागली. हा वार लावून जेवणारा गरीब हा संपन्न-श्रीमंत, हा या जातीचा - तो त्या जातीचा, या पलीकडे जाऊन रा. स्व. संघाच्या शाखेत गावातल्या सर्वच मुलांचे प्रेमाने स्वागत असे. या शाखेने प्रकाश यांचे बालपण आणि बालमनही त्यातल्या सुसह्य केले. दारिद्याच्या कचाट्यातही देशाची महानता, आपली सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकी याची माहिती झाली. आपण निराश न होता जगायला हवे, चांगले कार्य केले पाहिजे, ही ऊर्मी रा. स्व. संघाच्या शाखेतून त्यांना मिळाली.

दिवस जात होते. प्रकाश सातवी पास झाले. मात्र, पुढचा शिक्षणाचा खर्च कसा करणार? एका ओळखीच्या माणसाने प्रकाश यांच्या आईवडिलांना सांगितले की, मुंबईमध्ये एक कुटुंब आहे. त्यांचे सहा महिन्याचे बाळ आहे. दोन-तीन वर्ष बाळाला सांभाळण्यासाठी कुणीतरी एक जबाबदार मुलगा हवा आहे. त्याचे राहणे, खाणे आणि शिक्षण याचा खर्च ते कुटुंब करेल. प्रकाशच्या आईने निर्णय घेतला की, प्रकाशने पुढे
@@AUTHORINFO_V1@@