आनंदमय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |



 आपल्याला सर्वसामान्यपणे आनंद केव्हा होतो, जेव्हा आपले इप्सित साध्य होते. आपल्याला यश मिळते. आपली ऐहिक स्वप्ने पूर्ण होतात. योग्य वेळी योग्य गोष्ट होते. एकूण काय, आपल्याला हवे असलेले ते आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा आपले मन सुखावते.

 
आपल्याला आनंद मिळतो. या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला हव्या त्या पद्धतीने होत नाहीत आणि अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा साहजिकच आपले मन दुखावते. आपला आनंद जणू कुणी हिरावून घेतो आहे असे वाटते. ही जी आनंदाची व दुःखाची भाषा आहे ती खरंच अर्थपूर्ण आहे का? नक्कीच नाही. कारण, हा आनंद ‘तशा’ अर्थाने आंतरिक नाही. तो बाह्य घटनांवर अवलंबून आहे. पटला मनाला तर आनंद, नाहीतरी काहीच नाही.
 

आजच्या चंगळवादी आधुनिक युगात राहूनसुद्धा माणूस हा विज्ञानाभिमुख नक्कीच झाला आहे. अनेक सुविधा व ऐहिक सुखाची रेलचेल अवतीभोवती असते, पण पळापळ व दगदग मात्र काही केल्या थांबत नाही. ‘मला डिग्री मिळवायची आहे’, ‘मोठे घर हवे आहे’, ‘एक महागडी गाडी घ्यायची आहे’, ‘लवकरात लवकर सगळी प्रमोशन मिळवून मोठ्या पोस्टवर बसायचे आहे’, ‘मुलाबाळांना उत्तम शिक्षण द्यायचेअशा अनेकविध महत्त्वाकांक्षांना उराशी बाळगत पुढे चालत आहोत. अशावेळी मनापासून हवीशी वाटणारी एक गोष्ट सहज कधीच मिळत नाही. ती गोष्ट तशी प्राप्य आहे आणि अप्राप्यही आहे. ही गोष्ट म्हणजे, दुसरे-तिसरे काही नाही, तर एक ‘अप्रतिम सुंदर भावना’ आहे. ही भावना असायला हवी, खरे तर आपल्या मनात. ती जेव्हा हवी तेव्हा सापडत मात्र नाही. मग थोडेसे वेगळे विचार मनात येतात ‘काही नाही माझ्याकडे आज...’ पैसा आहे, प्रसिद्धी आहे, उत्तम संसार आहे, पण जीवाला आनंद नाही,’ खरेच या आनंदाचे महत्त्व जर माणसाला गांभीर्याने कळले तर खूपच छान. अर्थात, त्यासाठी आनंदाची खरीखुरी परिभाषा समजणे खूप गरजेचे आहे.

 

आपल्याला सर्वसामान्यपणे आनंद केव्हा होतो, जेव्हा आपले इप्सित साध्य होते. आपल्याला यश मिळते. आपली ऐहिक स्वप्ने पूर्ण होतात. योग्य वेळी योग्य गोष्ट होते. एकूण काय, आपल्याला हवे असलेले ते आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा आपले मन सुखावते. आपल्याला आनंद मिळतो. या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला हव्या त्या पद्धतीने होत नाहीत आणि अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा साहजिकच आपले मन दुखावते. आपला आनंद जणू कुणी हिरावून घेतो आहे असे वाटते. ही जी आनंदाची व दुःखाची भाषा आहे ती खरंच अर्थपूर्ण आहे का? नक्कीच नाही. कारण, हा आनंद ‘तशा’ अर्थाने आंतरिक नाही. तो बाह्य घटनांवर अवलंबून आहे. पटला मनाला तर आनंद, नाहीतरी काहीच नाही. दुसर्‍या लोकांच्या आयुष्यातली सुखाची व आनंदाची संकल्पना आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद देईलच असे नाही. याचाच अर्थ, आनंद हा आपल्या मनाच्या गाभ्यात निर्माण होतो. तो आपल्या मनाच्या तत्त्वज्ञानातून जन्म घेतो. आनंदाचा स्रोत बाह्य जगावर किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. अनेक गोष्टींमुळे आपल्याला आपल्या मनासारखे काहीतरी झाले म्हणून होणारा सुखद भाव हा तात्पुरता असतो. सकारात्मक असतो, म्हणून मन प्रसन्न होते एवढेच! अर्थात, बाल्यावस्थेत या छोट्या छोट्या गोष्टी आनंददायक असतात. कारण, या गोष्टींतून बालकांना आपल्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान मिळते. आईबाबा व इतर नातेवाईकांकडून शाबासकी मिळते. बक्षीसे मिळतात. म्हणून त्या आनंदाचे स्वरूप तसे ऐहीकच असते. त्या बालवयासाठी कदाचित ते योग्यच आहे. त्या कौतुकातून सकारात्मक प्रेरणा लहान मुलांना मिळत जाते. मग त्यांची स्वप्ने विकसित होतात. पण, काही काळानंतर या बाह्यगोष्टी आंतरिक आनंदासाठी पुरेशा नसतात. जेव्हा बाह्य गोष्टी आपल्याला आनंद देत नाहीत किंवा आपल्याला बाह्य गोष्टींतून आनंद मिळत नाही, तेव्हा आपल्याला तो कुठून व कसा मिळवायचा? असा प्रश्न पडतो. तो आतूनच यायला लागतो.

 

आपल्याला जर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ या स्थितीत पोहोचायचे असेल, तर थोडे जास्त क्रियाशील व्हायला हवे. प्रेरित व्हायला हवे. एका गोष्टीत यश मिळाले नाही म्हणून दुसरीकडे मग तिसरीकडे आणि मग कुठेच न स्थिरावता दिशाहीन भटकत राहणे नशिबात येते. त्यापेक्षा आपण आपला आनंद स्वतःच का नाही निर्माण करायचा? यासाठी गरज आहे ती आपल्याला काय आवडते, कुठली गोष्टी अतीव समाधान देते, आंतरिक शांती कशी मिळते हे समजून घ्यायची. माणूस शेवटी एक स्वतंत्र जीव आहे. म्हणूनच प्रत्येकाची आनंदाची परिभाषा वेगळी असू शकते. आनंद मिळवायच्या नादात आपण फक्त दैनंदिन जीवनात कुठून तरी काहीतरी घबाड मिळेल, लॉटरी लागेल, काहीतरी जादू होईल व व आयुष्य झळाळून जाईल याची वाट पाहत असतो. अशी नशिबाची लॉटरी बाजारात येणार नाही. नशीब शेवटी घडवावे लागते.

 

आयुष्य ही एक अप्रतिम भेट आहे. आपल्या जगण्याच्या संकल्पनेनेच ती दिली आहे. आपल्या सतत चालू असणार्‍या श्वासातून ती आपल्याला मिळत असते. याचाच अर्थ असा की, आपल्या जीवनाशी आपण काय करणार आहोत, आपला ‘जीने का ढंग’ कसा असणार आहे, आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत, या सर्वांवर आपला आंतरिक आनंद अवलंबून आहे. यासाठी आपल्याला आपल्या जीवनाविषयीच्या तत्त्वांना, जीवनशैलीला, स्वतःविषयीच्या भूमिकेला पुन्हा पुन्हा पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे मनाच्या दुर्बिणीतून पाहायला हवे. तरच आपण कुठे चाललो आहोत हे आपल्याला उमजेल.

-डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@