मेटास्टॅसिस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018
Total Views |



नुकत्याच ऐकलेल्या बातम्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी ऐकली ती म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्याला हाय ग्रेड कर्करोग झाल्याचे जाहीर केले. जगभरातील कोट्यवधी लोकांना आपल्या वेढ्यात ओढून घेणाऱ्या कर्करोगाच्या घटना गेल्या काही वर्षांत खूपच वाढल्या आहेत. कर्करोगाच्या अनेक प्रकारांपैकी, हाय ग्रेड कर्करोग हा तुलनेने अधिक आक्रमक असतो आणि त्याचा शरीरातील प्रसारही वेगाने होतो. तेव्हा, या कर्करोगाच्या प्रकाराविषयी अधिक जाणून घेऊया...

 

मेटास्टॅसिस म्हणजे काय?

कर्करोगाची शरीरातील उत्पत्ती ज्या प्राथमिक भागात होते, त्या भागापासून दूर असलेल्या शरीरातील इतर भागांमध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ होणे याला मेटास्टॅसिसम्हणतात. हा कर्करोग शरीरातील लिम्फ सिस्टीमम्हणजेच लसिका प्रणालींद्वारे किंवा रक्तावाटे पसरतो आणि शरीराच्या अन्य भागात यामुळे ट्युमर (गाठी) तयार होतात. हे नव्याने तयार झालेले ट्युमर्स सेकंडरी ट्युमरम्हणून ओळखले जातात. मेटास्टॅसिसबर्याचदा अनेक कर्करोगांच्या चौथ्या पायरीवर होतो आणि ही पायरी सर्वांत धोकादायक किंवा वाढलेली पातळी म्हणून ओळखली जाते. या पातळीवर पोहोचल्यानंतर, शरीरात सर्वत्र पसरण्यासाठी या कर्करोगपेशी मजबूत बनलेल्या असतात.

यकृत, फुफ्फुसे, लसिकांच्या गाठी आणि हाडे या भागांत मेटास्टॅसिस विकसित होण्याच्या शक्यता अधिक असतात. फुफ्फुसांचा कर्करोग झालेल्या ज्या रुग्णांमध्ये हा कर्करोग हाडांमध्ये पसरलेला असतो, त्या कर्करोगाला लंग कॅन्सर विथ बोन मेटास्टॅसिसअसे संबोधले जाते. निदान होण्यापूर्वीच ज्या रुग्णांचा कर्करोग शरीरात पसरलेला असतो किंवा निदान करतेवेळी कर्करोगाचे मूळ माहीत नसते, त्या कर्करोगाला कॅन्सर ऑफ अननोन प्रायमरी ओरिजिनअसे म्हणतात.

उपचार

मेटास्टॅसिस कर्करोगावरील उपचार हे त्या कर्करोगाचा प्रकार, त्याचे मूळ, गाठींचा आकार व अन्य घटकांवर अवलंबून असतात. कर्करोगाची वाढ होण्याचे प्रमाण व वेग कमी करणे हे या उपचारांचे मूळ ध्येय असते. केमोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि इम्युनोथेरपी या उपचार पद्धतींनी शरीरातील अन्य भागात कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबवण्यासाठी या कर्करोगांमध्ये नियोजित थेरपी दिल्या जातात. अन्य थेरपी प्रकारांमध्ये रेडिएशन, जैविक थेरपी आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो.

मेटास्टॅसिसशी झुंजणे महत्त्वाचे

एखाद्या व्यक्तीला अचानकपणे एखाद्या गंभीर आजाराने ग्रासले असल्याचे निदान होते, ती स्थिती त्या रुग्णासाठी व त्याच्या कुटुंबीयांसाठीही प्रचंड मानसिक अस्वास्थ्य घेऊन येते. मोठ्या आजारांमुळे कधीही न डगमगणारी माणसेही आतून हलून जातात. म्हणूनच, अशा आजारांशी दोन हात करणे हाच जीवंत राहण्याचा एक उपाय ठरतो.

वैयक्तिक थेरपी

यामुळे व्यक्तिगत समस्या दूर करण्यासाठी रुग्णाला मदत होते. थेरपिस्टशी बोलून आजारांशी असलेल्या दुव्याबद्दल जाणून घ्या. यामुळे रुग्णांमधील न्यूनभाव कमी होण्यात मदत होत असून आपल्यालाच जगाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचे बळ त्यांना मिळते.

ट्रॉमा थेरपी

आय मुव्हमेंट डिसेन्सिटायझेशन अॅण्ड रिप्रोसेसिंग’ (ईएमडीआर) या थेरपीनेही आजारामुळे आलेली मरगळ दूर करता येते. कर्करोगामुळे येणारा मानसिक ताण आणि नैराश्य दूर करण्यासाठी थेरपी आणि मानसोपचारांचा खूपच फायदा होतो. अर्थात, कर्करोगाचा प्रसार यामुळे रोखला जात नाही.

कौटुंबिक थेरपी

मानसिक आजारपणापासून व्यक्तीला दूर ठेवण्यासाठी हे फार महत्त्वाचे असते. एखादी व्यक्ती किंवा रुग्ण न्यूनगंड उराशी बाळगून राहिला असेल, तर लवकरच सारे काही सुरळीत, पूर्ववत होणार आहे असा आधार त्यांना देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत असणे फार महत्त्वाचे असते.

जेव्हा रुग्णाला स्वत:मध्ये उपचारांमुळे होणारी प्रगती दिसत नाही, तेव्हा तो आजार, उपचार आणि आपल्या माणसावर त्याचा होणारा सकारात्मक परिणाम त्या रुग्णाला दाखवून देणे हे काम कुटुंबातील सदस्य एकजुटीने चांगल्या प्रकारे करू शकतात. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णाचे कुटुंब व मित्रपरिवाराने त्या रुग्णाला आधार देणे फार महत्त्वाचे असते. मानसिक व भावनिक ताण, चिडचिड, नैराश्य या प्राथमिक लक्षणांकडे कुटुंबीयांनी बारकाईने लक्ष पुरवायला हवे.

या लक्षणांचा रुग्णाच्या बरे होण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंब, मित्रपरिवार आणि आजुबाजूचे लोक यांच्या सहकार्यामुळे रुग्णाला आशेचा किरण मनात बाळगायला फार मदत होते. रुग्ण व त्याचे कुटुंबीय या दोघांचाही मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा हा चांगला उपाय असू शकतो.

-डॉ. अनिल हेरूर

@@AUTHORINFO_V1@@