'त्या' पोलीस जवानाच्या मारेकऱ्यांचा अखेर खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |


कुलगाम : जम्मू-काश्मीर पोलीस दलातील मोहम्मद सलीम शाह या जवानाची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अखेर आज भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी यमसदनी धाडले आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्याकडून संयुक्तरित्या राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये आज तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

आज सकाळी कुलगाममध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस संचालक एसपी वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाममध्ये हे तिन्ही दहशतवादी लपून बसले होते. या दहशतवाद्यांची लष्कराला माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी मिळून याठिकाणी या दहशतवाद्यांचा शोध घेतला. यानंतर दोन्ही बाजूकडून झालेल्या गोळीबारामध्ये या तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान या तिघांचीही ओळख पटली असून यातील एक दहशतवादी हा लष्कर-ए-तोयबाचाचा असून अन्य दोघे जण खोऱ्यातील स्थानिक दहशतवादी आहेत. तसेच या तिघांकडून एके-४७ आणि काही शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत.





अपहरण करण्यात आलेला जवान :
 
 
@@AUTHORINFO_V1@@