आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2018
Total Views |

मुंबई : राज्यातील पेरण्यांचे सूक्ष्म नियोजन आणि अचुक संकलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि मूल्य आयोगानेदिलेल्या सूचनांचे राज्य शासने स्वीकार केला असून आता पीक पेऱ्याचे अचूक संकलन करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विभागाने आज नवीन अधिसुचना जारी केली असून देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज याविषयी माहिती दिली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सुचनानंतर शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीची अचूक नोंद गाव नमुना व नमुना १२ वर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेरलेल्या पिकांचा प्रकार व आंतरपिकांची अचूक नोंद घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी तलाठ्यांना मदत करावी, जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र गट तयार करावा, कर्मचाऱ्यांची कमतरता भासली तर कृषि विद्यापीठाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, असे सुचविण्यात आले आहे. त्यामुळे पिक पेऱ्यांची अचूक माहिती मिळणार आहे.
दरम्यान येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे सर्व काम पूर्ण करुन जमा केलेल्या माहितीची ऑनलाईन नोंद करण्यात यावी, असे देखील विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कामावर देखरेख ठेवुन प्राप्त माहिती मंडल, तालुका व जिल्हास्तरावर पीक निहाय विविध खात्यांना द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@