मिशनऱ्यांच्या सर्व संस्थांची तपासणी करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली : मिशनरिज ऑफ चॅरिटीतर्फे देशभरात चालविण्यात येणाऱ्या विविध संस्था आणि अनाथालयांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दिले आहेत. प्रत्येक राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी बेकायदेशीर कामकाजात सहभागी असलेल्या अशा सर्व संस्था व अनाथालयांची ओळख निश्चित करावी. मिशनऱ्यांची रुग्णालये, विशेषत: प्रसुती केंद्रे आणि अन्य संस्थांच्या कामकाजांवर बारीक लक्ष ठेवावे. तिथे जन्मजात बालकांची तस्करी केली जाते काय, याकडे प्रामुख्याने लक्ष ठेवण्यात यावे, असे मंत्रालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

 

मिशनऱ्यांच्या सर्व संस्था, अनाथालये आणि रुग्णालयांचा बारकाईने तपास करून, त्याबाबतचा अहवाल आगामी दहा दिवसांत सादर करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी अलीकडेच मिशनऱ्यांच्या बाल संगोपन गृहांची तातडीने तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जारी केले होते. त्यानंतर त्यांच्या मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. प्रत्येक राज्यात सरकारी अनुदानाद्वारे किंवा अन्य स्वयंसेवी संस्थांद्वारे सुरू असलेली बाल संगोपन केंद्रे इतर कोणत्या दत्तक देणाऱ्या संस्थांशी संलग्न आहेत काय, याचाही तपास केला जावा, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@