त्यांचे मुंडण करा, दगड मारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018
Total Views |



निदा खान-फारकत नक्वी विरोधात फतवा

नवी दिल्ली : इस्लाममधील तिहेरी तलाकच्या अमानुष प्रथेविरोधात मैदानात उतरलेल्या निदा खान आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहिण फरहत नक्वी या दोघींविरोधात एक फतवा जारी करण्यात आला आहे. ऑल इंडिया फैजान-ए-मदिना कौन्सिलचे प्रमुख मोइन सिद्दीकी यांनी हा फतवा जारी केला असून जो कोणीही निदा खान आणि फरकत नक्वी यांचे मुंडण करेल किंवा त्यांना दगडाने मारेल त्याला ११ हजार ७८६ रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे. ऑल इंडिया फैजान-ए मदिना कौन्सिलतर्फे नेहमीच अशा वादग्रस्त प्रकारचे फतवे जारी केले जातात.

 

निदा खान आणि फरकत नक्वी या दोघींनीही तिहेरी तलाकविरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळेच हा फतवा जारी करण्यात आल्याचे निदा खान यांनी एएनआयला सांगितले. तीन दिवसात मी देश सोडला नाही तर माझ्यावर दगडफेक करण्यात येईल, अशीही धमकी मला देण्यात आली आहे. दरम्यान, अशा प्रकारचे फतवे काढणार्या संस्था आणि माणसांना सरकारने रोखण्याची मागणीही निदा खान यांनी केली आहे. मी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना माझी व्यथा सांगणार आहे, असेही निदा खान यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@