‘सत्य हटाओ, सत्ता बचाओ’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018
Total Views |



लोकसभा निवडणुकांच्या आधी ममता बॅनर्जींची अखेरची धडपड


कोलकाता : भारतीय जनता पक्षाबद्दलचा द्वेष नसानसात भिनलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ मोहिमेची १५ ऑगस्टपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. मोदीविरोधी राजकीय पंडितांच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांनी या घोषणेतून २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, लोकसभेतील अविश्वासदर्शक ठरावाच्या नाट्यानंतर हा लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचा नव्हे, तर ‘सत्य हटाओ, सत्ता बचाओ’चा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी लोकसभेत मांडण्यात आलेला अविश्वासदर्शक ठराव ३२५ विरुद्ध १२६ अशा बहुमताने फेटाळल्यानंतर तर केंद्र सरकारवर विश्वास असल्याचेच सिद्ध झाले. एवढे होऊनही ममता बॅनर्जींनी आज देशभरात भाजपविरोधात आंदोलन छेडण्याच्या आरोळ्या ठोकल्या.

 

तृणमूल काँग्रेसकडून दरवर्षी २१ जुलै रोजी शहीद दिनाचे आयोजन केले जाते. आजही तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांनी शहीद दिनाचे आयोजन केले होते, यावेळी ममता बॅनर्जी बोलत होत्या. दरम्यान, यावेळी भाजपचे नेते चंदन मित्रा यांनी भाजपचा त्याग करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "१५ ऑगस्टपासून आपण ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ या मोहिमेला सुरूवात करणार आहोत. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन या मोहिमेच्या रूपातून एक मोठा प्रहार भाजपवर करायचा आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काही चांगली माणसे आहेत मी त्यांचा आदर करते. मात्र, काही जणांकडून अत्यंत गलिच्छ राजकारण करणे सुरू आहे," देशभरातून मॉब लिंचिंग अर्थात जमावाकडून मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. यातून लोकांमध्ये तालिबानी निर्माण करायचे आहेत का? असा प्रश्नही ममता बॅनर्जींनी विचारला. ”पश्चिम बंगालमध्ये असलेल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४२ जागाही आगामी निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस जिंकेल,“ अशी राणा भीमदेवी थाटातली घोषणाही त्यांनी केली. पण गेल्या काळात झालेल्या निरनिराळ्या निवडणुकांत भाजपच्या जागा आणि मतदान टक्केवारीही सतत वाढती राहिली आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींची ही घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मिदनापूरचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी काही समाज विघातक समूहांच्या हाती पश्चिम बंगालचा कारभार दिला गेला आहे. लोक त्यांच्या दहशतीत आहेत. असा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर म्हणून ममता बॅनर्जींनी आज आपले मत मांडले. लोक इतके दहशतीत आहेत की, बंगालमध्ये पूजा करणेही कठीण होऊ बसले आहे, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली होती. मात्र, पंतप्रधान बंगालच्या लोकांची दिशाभूल करत होते, असे म्हणत ममता बॅनर्जींनी ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ मोहिमेचा नारा दिला. पण ही घोषणा ‘सत्य हटाओ, सत्ता बचाओ’ अशीच असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

 

भाजप-संघ कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यासाठी

 

ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी आंदोलनाची केलेली घोषणा म्हणजे ज्यांना पश्चिम बंगालबाहेर कोणी ओळखत नाही, त्यांनी आणलेला आव आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसला हिंसाचाराचे वर्तुळ तयार करायचे आहे. आंदोलनाला सोन्याने वलयांकित नाव देऊन भाजप आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या घडवून आणण्याचा हा तृणमूल काँग्रेसचा डाव आहे. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांच्या विनासायास कत्तली करता याव्यात म्हणून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसने हे कारस्थान रचले आहे.

 

- माधव भांडारी,

प्रदेश भाजप मुख्य प्रवक्ते

@@AUTHORINFO_V1@@