पुणे विद्यापीठामध्ये पर्यावरण विज्ञानामधील पदवी अभ्यासक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018
Total Views |
 

 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मेलबर्न विद्यापीठ (युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न) आणि आयसर पुणे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन) यांच्या एकत्रित समन्वयामधून विद्यापीठामध्ये पर्यावरण विज्ञानामधील पदवी अभ्यासक्रम (बी. एस.सी. इन इन्व्हायरमेंटल सायन्स) सुरु करण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे असणार आहे.
 
या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेलबर्न विद्यापीठ व आयसरमधील प्राध्यापकांकडूनही अध्यापन केले जाणार आहे. आयसरमधील प्राध्यापक थेट विद्यापीठात येऊन शिकवणार आहेत; तर मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक ऑनलाईन पद्धतीने शिकविणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी पीसीबी/ पीसीएमबी/पीसीएम या तीनही प्रकारांमधून १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांत पर्यावरण विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर 'कोअर सायन्स'मधील विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे; तर अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व अखेरच्या वर्षात पर्यावरण विज्ञानाशी संबधित घटकांवर पूर्णतः लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
 
बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विज्ञानाशी संबधित असलेला हा अभ्यासक्रम या क्षेत्रात काम व संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरु शकेल.
 
@@AUTHORINFO_V1@@