देशभरातील माल वाहतूक आज बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |

खाजगी बस आणि ट्रक चालकांचा देशव्यापी संप

राज्यातील खासगी वाहन चालकही संपात सहभागी




मुंबई : टोल आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली वाढ यासह काही प्रमुख मागण्यासाठी खासगी वाहनचालकांकडून पुकारण्यात आलेल्या संपला आज देशभरात सुरुवात झाली आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांसह खासगी बस, टुरिस्ट कॅंब आणि स्कूल बस चालकांनी देखील या संपामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विद्यार्थांचे देखील हाल होऊ लागले आहे.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संघटनेच्या पुढाकाराने हा संप पुकारण्यात आला आहे. इंधन तेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून यामुळे वाहतूकदारांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. तसेच देशभरात सर्वच ठिकाणी टोल भरावा लागत असल्यामुळे त्याचा ताण देखील वाहतूकदारांनाच सहन करावा लागत. त्यामुळे सरकारने इंधन तेलाचे दर नियंत्रणात आणावेत, तसेच टोलमुक्त भारत ही संकल्पना राबवावी, अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे.


दरम्यान माल वाहतूकदारांच्या या संपामध्ये खासगी बसचालक, कॅब चालक आणि स्कूल बस चालकांनी देखील सहभाग घेतला आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी यामध्ये सहभाग घेतला असून स्कूल बस आणि कंपनी बस असोसिएशनने देखील आपल्या काही प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. ज्यामध्ये इंधन दरवाढीबरोबरच स्कूल बसला टोल न घेणे, चेसीसची एक्साईज ड्युटी माफ करणे अशा काही मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.



दरम्यान सरकारकडून मात्र यावर अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन यामध्ये जवळजवळ ४० लाखांहून अधिक मालक वाहतूकदार सहभागी होतील, असा दावा केलेला आहे. त्यामुळे या संपाचा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
@@AUTHORINFO_V1@@