जेव्हा राहुल गांधी नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतात तेव्हा....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत स्वत:लाच हसू करून घेत सभागृह दणाणून टाकले. भारतीय जनता पक्षाचे सदस्य मला ‘पप्पू’ समजतात म्हणून आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेणार आहे असे म्हणत आज सभागृहामध्ये राहुल गांधी यांनी चक्क नरेंद्र मोदी यांना गळाभेट दिली. त्यामुळे सभागृहामध्ये असणाऱ्या सगळ्या नेत्यांना हसू आवरले गेले नाही.
 
 
 
 
 
 
 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘बार’मध्ये जातात असे देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले. खरं तर नरेंद्र मोदी हे बाहेरच्या दौऱ्यावर जातात असे राहुल गांधी यांना म्हणायचे होते. मात्र त्यांचा जिभेवरील ताबा सुटला आणि त्यांच्या तोंडून काहीतरी वेगळाच शब्द उद्गारला गेला आणि यामुळे राहुल गांधी यांचे सभागृहात चांगलेच हसू झाले आणि यावर नरेंद्र मोदी देखील आपले हसू आवरू शकले नाही. 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@