व्हॉट्सअ‍ॅपचा भारतीय यूजरवर 'अंकुश'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : वाढत्या अफवांवर बंदी घालण्यासाठी भारतातील व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आता लगाम बसणार आहे. कारण आता खुद्द व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील आपल्या यूजरवर निर्बंध लादले असून यूजर आता एखादा मेसेज, व्हिडीओ व फोटो फक्त पाच व्यक्तींनाच फॉरवर्ड करू शकतो. अफवांमुळे धुळे जिल्ह्यात पाचजणांच्या जमावाकडून हत्या झाल्यानंतर केंद्र सरकारने व्हॅट्सअ‍ॅपला नोटीस बजावली होती. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपने सुरक्षितेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
 

व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत मेसेज फॉर्वर्ड करायला मर्यादा नव्हत्या. यामुळे एखादा व्हिडिओ, फोटो किंवा मेसेज अमर्याद लोकांना फॉरवर्ड करता येत होता. यामुळे अनेक अफवा व धार्मिक, जातीय भावना दुखावणारे मेसेज मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले जायचे. यातीलच मुलं चोरणारी टोळी तुमच्या शहरात सक्रिय झाली आहे. अशा माहितीचा मेसेज संपूर्ण भारतभर फिरत होता. यामुळे पूर्ण भारतात अनेक निष्पाप जीवांचा जमावाच्या मारहाणीत जीव गेला. यावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस पाठवत, अफवा थांबवण्यासाठी कडक पाऊले उचलण्याचे आदेश दिले होते.

 

केंद्र सरकारच्या आदेशानंतर व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेज या फीचर वर काम सुरु केले आहे. या नवीन फीचरनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाचपेक्षा जास्त व्यक्तींना फॉरवर्ड होऊ शकणार नाहीत. पाच व्यक्तींना मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर फॉरवर्ड करण्यात आलेला फोटो, व्हिडिओ व मेसेज पुढे कोणालाही फॉरवर्ड होणार नाही. यानंतर चॅटवरून फॉरवर्ड बटण हा पर्याय गायब होईल. त्यामुळे आता भारतीयांच्या व्हॉट्सअ‍ॅपला लगाम लागणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@