पत्रकारिता क्षेत्राचे कायदेशीरपणे नियमन व्हावे : कोकजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |



पुणे : पत्रकारिता क्षेत्रामध्ये बोकाळत चाललेल्या काही समाजविरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी पत्रकारिता क्षेत्राची योग्यरीत्या आखणी करून इतर क्षेत्रांप्रमाणे पत्रकारिता क्षेत्राचे देखील कायदेशीरपणे नियमन झाले पाहिजे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णु कोकजे यांनी आज व्यक्त केले आहे. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित श्री देवर्षी नारद पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार २०१८ च्या वितरण समारंभाप्रसंगी आज ते बोलत होते.
पुणे शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेचा वारसा लाभलेला आहे. परंतु सध्या काही लोकांच्या चुकांमुळे आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या खोट्या बातम्यांमुळे पत्रकारितेवरील विश्वासार्हता कमी होत निघाली आहे. काही लोकांनी केलेल्या चुकांची उत्तरे लोक प्रतिष्ठिती पत्रकारांकडे मागतात, त्यामुळे पत्रकारितेमध्ये बोकाळत चाललेल्या चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी म्हणून पत्रकारिता क्षेत्राचे कायदेशीररित्या नियमन झाले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पत्रकारांनी कोणत्याही बातमीची सत्यता पडताळल्या शिवाय कोणतीही बातमी प्रकाशित करू नये, पत्रकारांनी समाजाचे हित ध्यानात घेऊनच आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

विश्व संवाद केंद्राकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे यंदाचे हे ८ वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, सोशल मिडिया आणि छायाचित्रकार अशा चार पुरस्कारांसाठी नामांकने देण्यात आली होती. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम (ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार), नाशिकचे प्रवीण बिडवे (युवा पत्रकार पुरस्कार), सांगलीचे उदय देवळेकर (छायाचित्रकार पुरस्कार) आणि कोल्हापूरचे विनायक पाचलग यांना सोशल मिडिया पुरस्काराने गौरवण्यात आले.


याचबरोबर विश्व संवाद केंद्राच्या नव्या संकेतस्थळाचे देखील कोकजे यांच्या हस्ते यावेळी अनावरण करण्यात आले. यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख शरद कुंटे, संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण कानेटकर आणि इअतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आसावरी जोशी यांनी केले होते.
@@AUTHORINFO_V1@@