वर्षानुवर्षे कार्यरत शिक्षकांना शासनाकडून संरक्षणाची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |


 

आमदार निरंजन डावखरे यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
 

ठाणे: शिक्षक भरती रखडल्यामुळे शासनाची मान्यता न मिळालेल्या हजारो शिक्षकांना सरकारने मंजुरी देऊन सेवेत कायम करावे. या शिक्षकांना अभियोग्यता परीक्षेची सक्ती करू नये, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आ. निरंजन डावखरे यांनी केली आहे. या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

 

खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमध्ये शिक्षकभरती प्रक्रिया बंद होती. मात्र, अनेक शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या व शैक्षणिक गरज लक्षात घेऊन २०१२ पासून अनेक शिक्षकांची नियुक्ती केली. मात्र, भरतीवर बंदी असल्यामुळे शिक्षकांच्या पदांना सरकारकडून मान्यता मिळाली नाही. हजारो शिक्षकांना मान्यता नसल्यामुळे शालार्थ आयडी मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना वेतनापासून वंचित राहावे लागले, याकडे डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 

गेल्या वर्षभरापासून पगार रखडल्यामुळे शासनमान्यता न मिळालेले शिक्षक अस्वस्थ आहेत. ते पाच ते सहा वर्षांपासून विद्यादानाचे कार्य करीत आहेत. या शिक्षकांना न्याय मिळण्याची गरज आहे. एकीकडे पवित्र पोर्टलमध्ये शिक्षकांची नोंदणी सुरू असताना, वर्षानुवर्षे कार्यरत शिक्षकांपुढे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@