स्वामीनाथन आयोगामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा - सदाभाऊ खोत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |
 
 
 
 

नागपूर :  केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने स्वामीनाथन आयोग आणला. यामुळे धानाचे हमीभाव मिळणार असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
 
विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव व २६० अन्वये प्रस्तावावर उत्तर देताना खोत बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक राज्याचा उत्पादन खर्च वेगवेगळा असतो. त्यानुसार केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साडेतीन वर्षात सूक्ष्म सिंचन अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणात वाढ केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अडीचशे कोटी उपलब्ध करून दिले. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनाही ३  हजार २४६  कोटी देण्यात येणार आहेत, यातील १  हजार ९  कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
 
 
 
खोत म्हणाले, विम्याचे पैसे शेतकऱ्यांना उपलब्ध केले असून बोगस बियाणे कंपन्यांविरूद्ध कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. १४  लाख ९९ हजार शेतकऱ्यांनी बी फॉर्म भरले होते, त्यातील ७  लाख ३२ हजार सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. एक हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी बियाणे कंपन्यांना २००९  च्या कायद्यांतर्गत नोटिसा दिल्या आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@