भाजपने जारी केला पक्षादेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |

आपल्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचे आदेश 



नवी दिल्ली : विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांसाठी पक्षादेश जारी केला असून सर्व खासदारांना आज संसदेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

आज सकाळी ११ वाजता लोकसभेमध्ये मोदी सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यात येणार आहे. सरकारमधून बाहेर पडलेल्या तेलगु देशम पक्षाने आणि कॉंग्रेसने पुढाकार घेऊन सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे. केंद्रामध्ये सत्ते असलेल्या रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)कडे सध्या लोकसभेत ३५१ जागा आहेत. ज्यातील २७१ जागांचे पूर्ण बहुमत एकट्या भारतीय जनता पक्षाकडे आहे. या उलट विरोधकांकडून २१७ जागा असून यातील फक्त ६५ जागा या संपुआकडे (राष्ट्रीय पुरोगामी आघाडी) आहेत. तसेच उरलेल्या ११५ जागा या इतर पक्षांकडे आहेत. त्यामुळे सध्या मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत असून सरकारला कसल्याही प्रकारचा धोका सध्या तरी दिसत नाही. परंतु विरोधकांनी मोठ्या विश्वासाने अविश्वास सभागृहात दाखल केला असल्यामुळे विरोधक आज काय खेळी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@