निडज: एक निराळा प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2018
Total Views |



सर . जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई ने जगाला अनेक कलाकार बहाल केले. येथे प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा या कला महाविद्यालयाचा कौटुंबिक सदस्यच बनतो.

 

यावर्षी देखील नवीन येणार्या शंभर विद्यार्थ्यांच्या स्वागतास, इतर विद्यार्थी जे जे.जेत कलाशिक्षण घेत आहेत ते उत्सुक आहेत. नुकतीच या विद्यार्थ्यांनीसर . जी. उपयोजित कला महाविद्यालया सालाबादप्रमाणे परंतु नाविन्याची नवीनतम कल्पना सादर करीत २३५ वी जयंती सुंदररीत्या साजरी केली. त्याचवेळी गत शैक्षणिक वर्षाचा महाविद्यालयाचा जी. एस. म्हणजे जनरल सेके्रटरी असलेला प्रणित कांबळे याने एक शॉर्ट फिल्म तयार केली. त्या फिल्मचं नावनिडज

प्रणित म्हणतो,

कधी न सुटणारं...

आकाशाच्या कॅनव्हासवर...

मनाच्या कुंचल्याने...

प्रतिसृष्टी निर्माण करणारे

आकाशाला गवसणी घालणारे....

असे माझे जे. जे...”

सुमारे सात ते आठ मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये प्रणितने त्याच्या भावना व्यक् करण्याचा भावनिक प्रयत्न केलेला आहे. मला वाटते, त्याने ज्या भावना व्यक् केल्यात त्या प्रतिकात्मक आहेत. म्हणजे, प्रणित हा एक माजी विद्यार्थ्यांचा प्रतीक म्हणून भासतो. जे. जे.च्या माजी विद्यार्थ्यांची देखील या कला महाविद्यालयाशी घट्ट नाळ जुळलेली आहे, हे प्रणितनेनिडजद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

एक माजी विद्यार्थी, जे.जे च्या प्रांगणात येतो. जुन्या आठवणींमध्ये रमून जातो. त्याचं महाविद्यालयीन जीवन त्याला आठवतं आणि पिल्लू जसं स्वतःच्या घरट्यात येतंच येतं, त्याप्रमाणे जे.जेच्या विद्यार्थ्यांच्या मनाची अवस्था असते. हेनिडजद्वारे प्रणितने सांगण्याचा प्रयत्न केलाय.

 

तोमाजीपरंतु वयोवृद्ध विद्यार्थी जे.जे च्या कार्यालयात, वर्गांमध्ये, ग्रंथालयात आणि कॉलेज कॅन्टीनच्या कट्ट्यावर बसतो. जुन्या स्मृतींमध्ये त्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावतात. या सार्या दृश्यांना पाहताना एक कोमल स्वरांनी युक्त पार्श्वसंगीत सुरु असते. कुठेही कोणताही संवाद नाही. फक्त डोळे आणि शरीराच्या हालचालींचाच संवाद. प्रणित या मूक शॉर्ट फिल्मद्वारे अनेक भावभावनांना वाचा फोडतो.

 

सध्यानिडजयू-ट्युबवर पाहायला मिळेल. सर्वेश पवार, धीरज चांचड आणि अक्षय भागवत हे या फिल्मचे निर्माते आहेत. ओंकार कोतवाल सिनेफोटोग्राफी, तर सिद्धेश कृपाने साहय्यक आहेत. चेतन चौधरीने एडिटींग केले आहे, तर सर्वेश पवार आणि पंडित चौधरी यांनी कास्टिंग केले आहे.

 

या फिल्ममधील माजी विद्यार्थ्याची भूमिका ६५ वर्षीय पंडित जनार्दन चौधरी यांनी केली आहे. मूळ कल्पना प्रणित कांबळेची असून कलाजगताशी नातं असलेल्या जेजे ची नाळ, माजी विद्यार्थ्यांबरोबर जुळलेली असते... हे सांगण्याचा प्रणितनेनिडजद्वारे चांगला प्रयत्न केला आहे.

 
 
 
 

-प्रा. गजानन शेपाळ

 
 
@@AUTHORINFO_V1@@