अरबांची गोशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


मुळात बालाद्ना फार्म ही गोशाळा नव्हतीच. ती मेंढीशाळा होती. साधारण 70 हेक्टर्स जागेवर पसरलेल्या बालाद्ना फार्मकडे अवासी या नामांकित जातीचे पाच हजार मेंढे आणि 40 हजार मेंढ्या होत्या. ही संपूर्ण जगातली सर्वाधिक संख्या

 

तो पाहा कतार. अरेबियन द्वीपकल्पातलाच, पण इराणच्या आखातातला एक चिमुकला अरब देश. दोहा ही त्याची राजधानी. साधारण ६० कि.मी.अंतरावर अल् खोर नावाचं मोठं शहर आहे. या शहरात ती पाहा एक सुंदरशी गोशाळा. थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल १४ हजार हॉलस्टिन गायी आहेत तिथे. दर दिवसाला दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ मिळून ५०० टन एवढं उत्पादन होतं तिथे. यापैकी ८० टक्के पदार्थ कतारमध्येच खपतात. उरलेले निर्यात केले जातात. या गोशाळेचं नाव आहे बालाद्ना फार्म. अरबी भाषेतल्याबालाद्नाया शब्दाचा अर्थ आहे स्वदेशी. ‘बालाद्नाफार्मचे मालक आहेत मौताझ-अल् खय्याद आणि रमेझ-अल् खय्याद नावाचे कतारी अरब उद्योजक बंधू. पण, गोशाळेच्या एकंदर देखभालीसाठी त्यांनी सरळ दोन विदेशी तज्ज्ञ माणसं नेमून टाकलेली आहेत. पीटर वेल्टवर्डेन हा डच माणूस आहे. नेदरलँडच्या न्येनरोड बिझनेस स्कूलचा तो उच्चशिक्षित पदवीधारक आहे. तो बालाद्ना फार्मचा सीईओ म्हणजेचिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर.’ थोडक्यात सर्वेसर्वा आहे. त्याच्या हाताखालच्या संपूर्ण फार्मचं व्यवस्थापन पाहाणारा जॉन डोर हा आयरिश आहे.

 

काय म्हणता? एका गोशाळेला दोन- दोन विदेशी तज्ज्ञ नेमणं वगैरे परवडतं? अहो, परवडण्याचं काय घेऊन बसलायत, बालाद्ना फार्मने आपलं मूल्यांकन २० लाख कतारी रियाल एवढं असल्याचं जाहीर केलंय (1 कतारी रियाल= १८ .७७ रुपये) आणि आता बालाद्ना फार्म आपले समभाग विक्रीला काढतोय.थोडक्यात शेअर बाजारात उतरतोय. एवढंच नव्हे तर लवकरच बालाद्ना फार्म विविध फळांचे डबाबंद रस आणि गुरांचं पौष्टिक अन्न अशीही उत्पादनं बाजारात आणतोय. बाप रे ! एका गोशाळेची एवढी व्यावसायिक भरारीगोशाळा असा शब्द उच्चारला की, आपणा हिंदूंच्या मनात उद्योग-व्यवसाय, धंदा असे विचार येतच नाहीत.कारण, गाय ही आपल्यासाठी गोमाता असते. दूध किंवा गोमूत्र, गोमय याचं उत्पादन करणारं यंत्र नव्हे. तसंच बैल म्हटल्यावर आपल्याला बियाण्याचा वळू एवढंच फक्त आठवत नाही, तर हजारो वर्षे आमची कृषिसंस्कृती, ज्यांच्या श्रमावर भरभराटली तो बैल, असं आठवतं. थोडक्यात, आपल्या गोशाळा या गोमातेबद्दलच्या प्रेमातून उभ्या केल्या जातात.

 

कतार हा पर्शियन आखातातला एक चिमुकला अरबवंशीय देश. क्षेत्रफळ अवघं ११ हजार ५०० चौ.कि. मी आणि लोकसंख्या फक्त २६ लाख ४१ हजार. आपल्याकडचे तालुकेसुद्धा यापेक्षा मोठे असतात, पण कतारचं दरडोई उत्पन्न संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. लाख २८ हजार, ७०२ डॉलर्स ( डॉलर= ६८ .३७ रुपये) जगभरातून असंख्य हुशार लोक कतारमध्ये आलेले आहेत, येत असतात. कतारच्या अफाट पेट्रोल उत्पादनातून रोजी-रोटी कमावत असतात. गेल्या काही वर्षांत फार प्रसिद्धी पावलेलीअल् जझिराही दूरदर्शन वाहिनी कतारमधलीगेल्या वर्षी म्हणजे २०१७ सालीअल् जझिरावरील काही कार्यक्रमांतून अरब देशांमधल्या एकाधिकारी राजेशाहीवर खूप टीकाटिप्पणी करण्यात आली. यामुळे सौदी अरेबियन राजघराणं भडकलं, कारण अरब देशांमधली सर्वात मोठी नि सर्वंकष राजेशाही त्यांचीच आहे. अल् जझिराच्या पालकांना योग्य ती समज देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कतारच्या राजाकडे म्हणजे अमीर तमीम बिन हमद अक् थानी यांच्याकडे केली. थानी यांनी ती धुडकावून लावली. सौदी अरेबिया भयंकर संतापला. ‘मी अरेबियन द्वीपकल्पातला सगळ्यात मोठा देश, इस्लामची जन्मभूमी आणि माझ्या पायाच्या अंगठ्याएवढा हा कतार माझं ऐकत नाही?’ सौदी राजघराण्याच्या कानातून, नाकातून, तोंडातून, डोळ्यातून थोडक्यात शक्य त्या सर्व ठिकाणांमधून संतापाच्या वाफा निघू लागल्या, पण कतार ऐकेना. शेवटी जून २०१७ पासून सौदीने कतारबरोबरचे सर्व राजनैतिक संबंध तोडून टाकले. कतारची पश्चिम सरहद्द सौदीला लागूनच आहे. उत्तरेला बहरीन आहे, तर दक्षिणेला संयुक्त अरब अमिराती आहेत. या देशांनीही सौदीला साथ दिली. हाएम्बार्गोकिंवाब्लॉकेडम्हणजे व्यापारबंदी, राजनैतिक संबंध बंदी आज वर्ष उलटून गेल्यावरही चालूच आहे, पण कतार जराही नमलेला नाही.

 

सौदी अरेबिया आणि अमेरिका आज मित्रदेश आहेत. माईक पॅम्पिओ हे अमेरिकन परराष्ट्रमंत्री मध्यंतरी मध्य पूर्वेच्या दौर्यावर आले होते. परराष्ट्रमंत्री हा इसम साधारणपणे गोड-गोड बोलणारा असावा, असा एक संकेत आहे. पॅम्पिओ हे याच्या उलट म्हणजे एक घाव दोन तुकडे पद्धतीने बोलणारे गृहस्थ आहेत. पूर्वी तेसीआयएया गुप्तवार्ता खात्याचे प्रमुख होते, त्याचा हा परिणाम असावा. त्यांनी सौदी राज्यकर्त्यांना सरळ सुनावलं की, ‘बंदी वगैरे नाटक पुरे झालं. आम्हाला आता कंटाळा आला. कतारचं बरोबर आहे असं नव्हे, पण आमचे मित्र (म्हणजे तुम्ही) तरी कुठे सरळ आहेत?’ ...तर कतारने या व्यापार बंदीसमोर माघार घेण्याचा जो निर्णय घेतला, त्याचा बालाद्ना फार्मपुरता परिणाम आपण इथे पाहूया.

 
 
 
 

मुळात बालाद्ना फार्म ही गोशाळा नव्हतीच. ती मेंढीशाळा होती. साधारण ७० हेक्टर्स जागेवर पसरलेल्या बालाद्ना फार्मकडे अवासी या नामांकित जातीचे पाच हजार मेंढे आणि ४० हजार मेंढ्या होत्या. ही संपूर्ण जगातली सर्वाधिक संख्या आहेआपली अशी एक समजूत आहे की, अरब लोक फक्त मांस खातात. प्रत्यक्षात अरब शेळ्या-मेंढ्या-उंट-गाय यांचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, लोणी, चीज हेदेखील खातात. अलमाराई ही सौदी अरेबियन कंपनी कतारला दूध निर्यात करत होती, पण जून २०१७ पासून ही निर्यात बंद झालीबालाद्ना फार्मने कतारी राज्यकर्त्यांच्या मदतीने एक फार मोठा निर्णय घेतला. आपल्याकडे जशी गायींची गीर ही जात खूप दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे, तशी युरोपात हॉलस्टिन ही जात प्रसिद्ध आहे. बालाद्ना फार्मने एका फटक्यात ३४०० हॉलस्टिन गायी युरोपातून आणवल्या. त्यांची उत्तम व्यवस्था लावली आणि महिन्याभरात म्हणजे जुलै २०१७ मध्ये त्यांचं दूध बाजारात आणलंसुद्धायानंतर अमेरिकेतून जहाजांमधून टप्प्याटप्प्याने गायी आणल्या गेल्या. आज त्यांची संख्या 14 हजार आहे. दिवसाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याचं सुमारे ५०० टन एवढं उत्पादन होतंय. दुग्धजन्य पदार्थात चीज, योगर्ट आणिलाबाननावाचं एक पेय आहे. हे पेय दूध आंबवून केलं जातं नि अरबांना ते फार आवडतंआता बालाद्ना फार्मची पुढच्या वर्षीची म्हणजे २०१९ ची योजना पाहा. फळांचे हवाबंद डबे आणि पशुखाद्य यासोबतच एक विशाल कुक्कुटपालन केंद्र चालू होत आहे. यात वर्षाला चार कोटी कोंबड्यांमधून मांस म्हणजे चिकन उत्पादन होईल, तर दोन कोटी अंडी निर्माण केली जातील.

 

कतारच्या अरब मुसलमानांनी चक्क गोशाळा उघडल्याचं एक कौतुकमिश्रित आश्चर्य जर आतापर्यंत आपल्याला वाटलं असेल तर ते वरच्या वृत्तांताने ओसरलं असेल. मध्य पूर्वेतले लोक शतकानुशतकं शेळ्या-मेंढ्या-उंट, क्वचित गाय-बैल यांचे तांडे पाळत आले आहेत. हे प्राणी दूध, लोकर, मांस, चामडी, प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांनी उपयोगी पडतात,परंतु पाळलेल्या प्राण्याचे मांस खायलाही त्या लोकांना कोणतीही भावना वगैरे आड येत नाहीम्हणजेच कतारने उघडलेली १४ हजार गायींची गोशाळा ही सौदी अरेबियन व्यापार बंदीवर तोडगा म्हणून आहे. गोवंश संवर्धनासाठी नव्हे, त्यामुळेच गोशाळेच्या शेजारीच कोंबड्यांचा खाटिकखाना उघडण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. कतारी नागरिकांना कोंबड्यांचं मांसही हवंच आहे. तोही किफायतशीर व्यवसायच आहेआपल्याकडचे मांसाहारी लोक पाळलेल्या कोंबड्या-बकर्या खातात. क्वचित ससा, रानडुक्कर खातात, पण पाळलेल्या म्हशी-रेडे किंवा गाय-बैल मारून खात नाहीत. उलट त्यांच्यावर पोटच्या पोरासारखं प्रेम करतात. गोवंशाचं मांस खाणं धर्माने निषिद्ध ठरवलंय आणि काळ कितीही आधुनिक वगैरे झाला, तरी सर्वसामान्य मांसाहारी माणूस धर्माला धरूनच वागतो, असं आपण म्हणूया. पण म्हैस-रेडा यांचं काय? कुत्रा, मांजर यांचं काय? म्हणजेच मांसाहारातसुद्धा आपल्याकडे काही नियम आहेत. ते जगभरात फक्त आपल्याचकडे का, याचाही अभ्यास व्हायला हवा.

@@AUTHORINFO_V1@@