धुळे हत्याकांड : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर देणार राईनपाड्याला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |



धुळे :
मुले पळवणारी टोळी समजून धुळ्यातील राईनपाडा या गावातील ग्रामस्थांनी पाच नागरिकांची हत्या केल्याच्या घटनेनंतर गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हे आज राईनपाड्याला भेट देणार आहेत. पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात कडक सुरक्षाबंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण राईनपाड्याला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे.


आज सकाळी ११ वाजता केसरकर हे राईनपाड्यामध्ये पोहोचणार आहेत. यावेळी केसरकर यांच्यासह धुळे, नाशिक आणि जळगाव विभागातील काही पोलीस अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यावेळी केसरकर हे स्वतः ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत. तसेच पोलिसांना देखील या घटनेविषयी काही विशिष्ट सूचना देणार आहेत. दरम्यान गावामध्ये याविषयी अफवा पसरवलेल्या दोषींवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी आपल्या या दौर्याच्या पार्श्वभूमीवर दिले आहे.

गावातील लहान मुले पळवण्यासाठी म्हणून गावात एक टोळी आल्याच्या अफवेमुळे राईनपाड्यातील ग्रामस्थांनी काल पाच नागरिकांची बेदम मारहाण करून हत्या केली. फक्त अफवेमुळे या पाच जणांची हत्या केल्यामुळे काल राज्यभर या बातमीने धुमाकूळ घातला होता. यावेळी मारहाण होत असलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळे हे प्रकरण अधिकच तापले आहे. पोलिसांनी या हत्येसाठी आतपर्यंत २३ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात  आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@