राईनपाडा घटनेचा तपास एस.आय.टीकडे वर्ग होणारप्रशासनाचे आश्‍वासन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 
 
 

राईनपाडा घटनेचा तपास एस.आय.टीकडे वर्ग होणार
प्रशासनाचे आश्‍वासन

जळगाव, २ जुलै
राईनपाडा ता.साक्री जि.धुळे येथे मुले पळविण्याच्या संशयावरुन गावकर्‍यांकडून ५ जणांना मारहाण होवून यात त्यांचा मृत्यू झाला. मयतांची ओळख पटली असून मयत हे सोलापुर जिल्ह्यातील आहे. २ रोजी मृतांच्या नातेवाईकांनी विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या त्यातील ४ मागण्या आश्‍वासीत करण्यात आल्या आहेत.
 
 
मुले चोरुन नेण्याच्या संशयावरुन राईनपाडा ता. साक्री जि. धुळे येथे गावकर्‍यांकडून झालेल्या मारहाणीत दादाराव भोसले, राजुमामा भोसले, भारत भोसले, भारत माळवे, अग्नु इंगोले या भिक्षुकी करणार्‍या व्यक्तींचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकानी केलेल्या विविध मागण्यांपैकी ४ मागण्या प्रशासनाने आश्‍वासित केल्या आहेत. यात घटनेतील दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नातेवाईकाच्या मागणीनुसार गुन्ह्याचा तपास एस.आय.टी.कडे देणेबाबत उचित निर्णय घेण्यात येईल.याखटल्यात सरकारी वकिल म्हणून ऍड.उज्वल निकम यांची नेमणुक करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.मृत व्यक्तींना सानुग्रह मदत देणे बाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यात येवून शासनाकडे सादर करण्यात येईल.याबाबत व्यक्तीश पाठपुरावा करण्यात येईल. मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देणे बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येऊन शासनाच्या पुढील निर्देशनाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.भिक्षुकी व्यवसाय करणार्‍या लोकांमधील असुरक्षिततेची भावना काढणेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले जातील . भिक्षेकरी संरक्षण कायदा बनविण्याची मागणी शासनाला कळविण्यात यईल या मागण्या राहुल रेखावार ,जिल्हादंडाधिकारी धुळे यांनी आश्‍वासित केल्या आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@