अफगाणिस्तानमधील हल्ल्याचा भारताकडून निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली :
अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरामध्ये काल झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा भारत सरकारने आज तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर आज आपली प्रतिक्रिया दिली असून अशा संकट प्रसंगी भारत नेहमी अफगाणिस्तानच्या सोबत राहील, अशी ग्वाही देखील भारताने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्या वेळापूर्वीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'अफगाणिस्तानच्या बहुसांस्कृतिक परंपरेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्याचा भारत सरकार तीव्र निषेध करत असून अशा संकटसमयी भारत सरकार हे नेहमी अफगाणिस्तानच्या सोबत उभे आहे' असे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने देखील यावर आपली प्रतिक्रिया देत, या हल्ल्याला भ्याड हल्ला घोषित केले आहे.



जलालाबादमधील गव्हर्नर हाऊसच्या अगदी जवळ असलेल्या हा मार्केटमध्ये काल संध्याकाळी हा हल्ला झाला. याहल्ल्यामध्ये एकूण १९ नागरिकांचा मृत्य झाला. तसेच २२ नागरिक गंभीररित्या जखमी झाले. विशेष करून भारतीय समुदायातील नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता. दरम्यान या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील भारतीय अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनेतील जखमी भारतीय नागरिकांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@