बोळे येथील पशुवैद्यकीय रुग्णालय १० वर्षापासून धूळखात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 
 
 
बोळे येथील पशुवैद्यकीय रुग्णालय १० वर्षापासून धूळखात
जळगाव, २ जूलै
पारोळा तालुक्यातील बोळे येथे पुशवैद्यकीय रुग्णालय असुन तेथे डॉक्टर नसल्याने दवाखाना धुळखात पडलेला आहे. १० वर्षापासुन याठिकाणी डॉक्टर नसल्याने शेतकर्‍यांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे.गुरांच्या दवाखान्यात डॉक्टरची नेमणुक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ठराव करून दिली आहे.
 
पारोळा तालुक्यातील बोळे येथील पशुवैद्यकीय दवाखाना असून तो २.५ एकर जागेत बनविला आहे. गावातच पशुवैद्यकीय दवाखाना आहे आणि तो पण सरकारी म्हणून की काय पूर्वी बोळे गावात गुरांची संख्या जास्त होती. आता दवाखाना तोच आहे आणि त्याला वाली कोणीही नाही. मागील १० वर्षापासून या दवाखाण्यात डॉक्टर नाहीत. रावसाहेब गिरासे यांनी याबाबत वेळोवेळी सदर विभागाला विनंती पूर्वक अर्ज केलेत, आणि डॉक्टर नियुक्ती करावी किंवा काही तरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी ही केली पण प्रशासनाने त्यांच्या कडे दुर्लक्ष केले. दवाखान्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुपारी तेथे पत्त्यांचा डाव मांडला जातो. जवळच प्राथमिक शाळा आहे. पत्त्यांच्या डावाचा त्यामुलांवर विपरीत परिमाण होऊ नये म्हणून शिक्षकांनीही तक्रार केली आहे. दवाखान्यात अतिक्रमण देखील आता होऊ लागले आहे. गावातील गुरांच्या देखभालीसाठी आता तरी डॉक्टर नेमावे अशी विनंती बोळे ग्रा.प.च्या ग्रामसभेत रावसहवेब गिरासे यांनी घेऊन तसा ठराव मंजूर करून घेतला आहे. ग्रामसभेला सरपंच रेषेमबाई गिरासे, रावसाहेब गिरासे, सखाराम चौधरी, राजेंद्र कोळी, सुरेखा कोळी, साहेबराव भिल सर्व ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@