“माझे खामगांव हिरवेगार”चा घेतला संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 
 
खामगाव : यंदाच्या वर्षी राज्यात १३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. खामगांव शहरात नगर पालिकेने संपुर्ण खामगांव शहरात एकुण ३००० झाडे लावण्याचाच नाही तर तो जोपासण्याचा देखील कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज शाळा क्र.१२ येथे केला. यावेळी संपुर्ण खामगांव शहरातील विविध सामाजिक संघटना प्रभाग १ मधील जनसामान्य नागरीक, एनसीसी, व एनएसएस चे कॅडेड, नगर परिषद कर्मचारी वर्ग, महिला, नगर सेवक – सेविका, सभापती, जि.प.सदस्य, पं.स.यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
 
 
केवळ वृक्ष लागवड करुन आपली जबाबदारी संपत नाही, तर वृक्ष संवर्धन करणे देखील आवश्यक आहे. यावर्षी आपण नगर पालिकेत संबंधीत कंत्राटदाराला वृक्ष लागवडच नाही तर लावलेले वृक्ष जोपासण्याची देखील जबाबदारी दिली आहे. त्यामुळे यातून वृक्ष जगण्याचे प्रमाण वाढणार असून या अभियानात खामगांव नगरीतील जनसामान्यांनी सहभागी होऊन ही एक लोकचळवळ व्हावी व “सुंदर शहर स्वच्छ शहर” नंतर आता “माझे खामगांव हिरवेगार!” चा संकल्प खामगांव करांनी घ्यावा. खामगांव शहरात मोठयाप्रमाणात पर्यावरण प्रेमी आहेत. प्रत्येकजण आपल्या परिने पर्यावरण जोपासण्याचा प्रयत्न करतोच आहे. त्यात न.प.प्रशासन देखील आता साथ देणार आहे. त्यामुळे आपल्या घरासमोरील झाड जोपासण्याची जबाबदारी आपल्या घरातील मुलाला किंवा मुलीला देऊन त्यांच्या नावाने ते झाड लावावीत असे स्थानिक आमदार अॅड. आकाश फुंडकर यावेळी म्हणाले.
 
 
यावेळी नगर परिषदेतीचे नगराध्यक्षा अनिताताई डवरे, न.प.उपाध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार, वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष सागरदादा फुंडकर, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई शरदचंद्र गायकी, जि.प सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, भाजपा तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, उप सभापती भगवानसिंग सोळंकी, सर्व सभापती, नगर सेवक-सेविका यांच्यासह मोठया प्रमाणात नागरीक सहभागी झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@