'लोकपाल' विधेयक कधी लागू करणार ते सांगा : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १० दिवसांच्या आत लोकपाल बिल लागू कधी लागू करणार हे सांगण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यासंबंधीचे एक प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयातर्फे केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि आर. बानुमती यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
 
 
यासंदर्भात पुढील सुनावणी १७ जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी लोकपालच्या नियुक्तीच्या मुद्यावर प्राप्त झालेल्या लेखी सूचनांनुसार सरकारला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने अवमानाची याचना दाखल केली होती, त्यावर आज सुनावणी करण्यात आली, त्यानुसार हे आदेश देण्यात आले आहेत. २७ एप्रिल रोजी या संस्थेने हा मुद्दा उपस्थित केला होता.
 
 
याविषयी गेल्यावर्षी केंद्र सरकारने 'लोकपाल' विधेयकमध्ये सुधारणा होईपर्यंत हे विधेयक प्रलंबित ठेवण्यात यावे असे सांगितले होते. मात्र आता हे विधेयक कधी लागू करणार असा जाब सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@