सोशल मीडियावर अफवांचे पीक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |




अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई : धुळ्यातील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुले पळवण्याच्या संशयावरून धुळ्यात जमावाने पाच जणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

 

रविवार दि. १ जुलै रोजी साक्री तालुक्यामधील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर पाच जणांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. मुले पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरल्यानंतर जमावाने त्या पाच जणांवर संशय व्यक्त करत त्यांची हत्या केली होती. गावात भरलेल्या आठवडी बाजारादरम्यान मुले पळवणारी टोळी आल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला आणि त्यानंतर गावात त्याची अफवा पसरली होती. त्यानंतर काही जणांनी त्या पाच जणांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली असून मृतांच्या कुटुंबियांनाही ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

 

 

धुळे जिल्ह्यात संशयावरून घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. अशा वेळी निर्दोषांना इजा होऊ शकते. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी.

- रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री

 

लोकांच्या मनात अशा प्रकारची भीती येण्याचे मुख्य कारण म्हणजे बेपत्ता मुले सापडत नाहीत, किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या व्यक्ती पकडल्या जात नाहीत. जर लोकांचा अशा अफवांवर विश्वास बसायला नको असेल, तर यंत्रणांवरील त्यांचा विश्वास वाढायला हवा.

- निलम गोऱ्हे, आमदार (शिवसेना)

@@AUTHORINFO_V1@@