वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या निर्मितीत महाराष्ट्राचे योगदान मोठे- दीपक केसरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 
 
वस्तू आणि सेवा कर दिनाच्या शुभेच्छा देतांना राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की वस्तू आणि सेवा कर कायदा निर्माण करतांना त्यात महाराष्ट्राचे आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे योगदान खूप मोठे आहे. वस्तू व सेवा कर सुलभ नाही तर ते राज्य आणि केंद्राच्या समन्वयाचे प्रतीक आहे. यात महाराष्ट्राने आग्रही भूमिका घेऊन कर दर कमी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
 
 
 
काही वस्तू ५ टक्क्यांच्या स्लॅबमधून ० टक्के कर दरात आणण्यात आणि १२ टक्क्यांच्या कर दराच्या वस्तू ५ टक्के कर दराच्या स्लॅबमध्ये आणण्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा होता. ही कर प्रणाली यशस्वीरित्या राबवली गेल्याने महाराष्ट्राला पहिल्या दोन महिन्यानंतर केंद्राकडून नुकसान भरपाई घ्यावी लागली नाही असे सांगून त्यांनी मूल्यवर्धित कराच्या जून्या प्रलंबित प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांना सुलभता द्यावी अशी सूचनाही केली.
 
 
कार्यक्रमात या कर प्रणालीची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात आमदार राज पुरोहित यांनी या करप्रणालीच्या अंमलबजावणीसंदर्भातील त्यांचे अनुभव सांगितले केंद्रीय मुख्य आयुक्त श्रीमती शर्मा यानीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@