सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इस्राईलच्या राजदूताचे व्याख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड डिफेन्स अनॅलिसिस (वायसी-निसदा) विभागामार्फत "इंडिया अँड इस्राएल, अ मल्टीफॅसेटेड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'' या विषयावर भारतातील इस्राईलचे महामहिम राजदूत डॅनियल कार्मन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्मन यांचे हे व्याख्यान ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये होणार आहे.
 
संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी या संदर्भातील माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुंबईतील इस्राईलच्या दुतावासाचे महामहिम श्री याकोव्ह फिंकेलस्टीन हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एन एस उमराणी व मुंबईतील इस्राईलच्या दूतावासामधील राजकीय अधिकारी व विशेष प्रकल्प अधिकारी श्री अनय जोगळेकर हेदेखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@