निरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
नवी दिल्ली : प्रसिद्ध दागिने निर्माते निरव मोदी याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केला आहे. पंजाब नॅशनल बँकेचे हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेल्या निरव मोदीवर आता इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केला आहे. निरव मोदी गेल्या अनेक महिन्यापासून विदेशात फरार झाले आहेत. 
 
 
 
आता आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेला त्यांच्यावर नजर ठेवा असे आदेश इंटरपोलने दिले आहे. एखाद्या देशातील गुन्हेगार जर विदेशात पळून जावून लपून राहत असल्यास त्याच्यावर इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करीत असते. या नोटीसमध्ये या व्यक्तीवर पाळत ठेवली जात असून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून नजर ठेवली जात असते. 
 
 
 
खोटी हमी देवून हा इतका मोठा घोटाळा करण्यात आला असून सध्या निरव मोदी यांच्या ११ राज्यांमधील ३५ ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. तसेच निरव मोदी यांच्या २९ जागा आणि १०५ बँक खाते देखील आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. २०११ पासून निरव मोदी व्यवहारासाठी खोटा परवाना वापरात होते. निरव मोदी यांच्या विरुद्ध ईडी, सीबीआय, आयटी आणि डीआरआय हे विभाग कसून चौकशी करीत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@