जावसईच्या टेकडीवर हिरवागार गालिचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |





अंबरनाथ: दोन वर्षांपूर्वी लोकसहभागातून करण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम यशस्वी झाली असून त्यावेळी लावण्यात आलेल्या रोपांपैकी ९५ टक्के झाडे बहरू लागली असून अंबरनाथच्या जावसई गावातील टेकडीवर हिरवागार गालिचा पसरल्याचे आढळून येते.

 

वृक्षलागवड मोहिमेंतर्गत दोन वर्षांपूर्वी २०१६ जुलै रोजी जावसईच्या टेकडीवर ओसाड असलेल्या जागेमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि जावसईचे स्थानिक रहिवासी यांच्या सहकार्याने ७८ हजार साग, खैर यांसारख्या विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली होती, अशी माहिती अंबरनाथ तालुक्याचे वनक्षेत्र अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी दिली. एकीकडे शहरांमध्ये सिमेंटची जंगले निर्माण होत आहेत. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. अशा वातावरणातही जावसईच्या टेकडीवर विविध प्रकारची रोपे लावण्यात आली होती. या ठिकाणच्या हिरवे गावाचे ग्रामस्थही रोपांची योग्य रितीने काळजी घेत आहेत. पावसाळ्यातील पाण्यावरच झाडे तगली असून रोपांची मशागत केली, याशिवाय वणव्यासारख्या आगीपासून रोपांचे संरक्षणदेखील केल्याने ९५ टक्के झाडे दिसू लागली आहेत, असे वनाधिकारी शेळके यांनी सांगितले.

 

टेकडीवर वृक्षारोपण योजनेच्या माहितीची केंद्र शासनाच्या वनविभागाने दखल घेतली आहे, योजनेची माहिती राज्य आणि केंद्र शासनाला सांगण्यात आल्यावर केंद्रीय पातळीवरील एका पथकाने जावसई परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर रोपे कशी तयार करण्यात येतात, त्या रोपवाटिकेलादेखील भेट दिली आणि माहिती जाणून घेतल्याचे शेळके म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@