भिवंडीतील टोरेंट पॉवर कंपनी विरुद्ध फौजदारी खटला दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |




भिवंडी: भिवंडीच्या रोशनबाग येथे राहणारे अताउल्ला मो. यासिन अन्सारी यांनी टोरेंट पॉवर कंपनी आणि कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली होती. आरोपी कंपनीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबतची माहिती मयत यांच्या पत्नीने भोईवाडा पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकार्‍यांना दिली होती. आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई संबंधितांवर झालेली नाही. कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी टोरेंट विरोधी समितीचे निमंत्रक विजय नामदेव कांबळे यांनी भिवंडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पुढील सुनावणी दि. ६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. टोरेंट पॉवर कंपनी आणि त्यांचे अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात हा चर्चेचा विषय बनलेला आहे.

 

फिर्यादी विजय कांबळे यांनी टोरेंट पॉवर लिमिटेड, कैलास पटेल (महाव्यवस्थापक), प्रकाश सजनानी (उपाध्यक्ष), दी पक शुक्‍ला, राजेश शानबाग (व्यवस्थापक) अशा पाच जणांना आरोपी केलेले आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार असे आहे की, अताउल्ला अन्सारी यांचा खाडीपार येथे पॉवरलूम कारखाना होता. त्यांच्या कारखान्यातील विजेचे मीटर विनानोटीस काढून नेले शिवाय त्यांनी वीजचोरी केलेली नसताना वीजचोरी केली म्हणून ८ लाख ९ हजार ४६५ अशा रकमेची दंड आकारणी केली. फिर्यादीतील आरोपीची भेट घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले व दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर दंडाच्या रकमेपैकी काही रक्कम भरून घेतली आणि कारखान्याला मीटर लावून दिला. अखेर न्यायालयाने खटला दाखल करून घेऊन त्यावर दि. 6 जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@