बुराडी प्रकरणात एका तांत्रिकाला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : दिल्ली येथे काल बुराडी येथे घडलेल्या भीषण मृत्युकांडासंबंधी पोलिसांनी आज एका तांत्रिक आणि त्याच्या साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एकाच घरात ११ मृतदेह आढळल्यानंतर राजधानी हादरली होती, त्यानंतर आज हे मृत्युकांड अंधश्रद्धेतून झाली असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी एका बाबा आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.
 
काल दिल्लीच्या बुराडी भागात एकाच परिवारातील ११ नागरिकांचे मृतदेह राहत्याघरी आढळल्यानतंर एकच खळबळ माजली आहे. आज या प्रकरणासंबंधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. मृत भाटिया परिवाराच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना घरातून दोन वह्या सापडल्या आहेत ज्यामध्ये ज्यापद्धतीने भाटिया परिवाराचा मृत्यु झाला त्याची क्रिया लिहिलेली आहे. या वह्यांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार अंधश्रद्धेतून या परिवाराने सामूहिक आत्महत्या केली असल्याचे किंवा इतरकुणी या परिवाराची हत्या केली असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
या वह्यांमध्ये हात आणि तोंड बांधण्यासंबंधी देखील लिखाण आढळले आहे. तसेच मोक्षप्राप्तीसाठी अशा पद्धतीने मृत्युमुखी पडण्याविषयी देखील लेख सदृश्य लिखाण आढळलं आहे. त्यामुळे ही एक सामूहिक आत्महत्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. "वृद्ध महिलेला वर चढून फाशी घेता येणार नाही, त्यामुळे तिला जमिनीवर झोपून मरण्याची परवानगी आहे." असे या वह्यांमध्ये लिहिण्यात आले आहे.
 
नेमके काय आहे प्रकरण :

काल देशाची राजधानी दिल्ली एका खळबळजनक घटनेमुळे हादरली. काल सकाळी दिल्ली येथील बुराडी भागात एकाच घरात ११ मृतदेह आढळले. या भीषण घटनेमुळे परिसरात तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक एकाच घरातील सदस्य आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे का ? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@