वीजतार तुटून पडल्याने बसेस जळून खाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |

दूरदर्शन टॉवरसमोरील घटना, दोनवेळा झाले स्पार्किंग

 
जळगाव/फैजपूर :
जळगाव-भुसावळ रस्त्यावर दूरदर्शन टॉवरसमोर एका मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तीन खासगी प्रवासी बसेसवर रविवारी दुपारी अचानक वीजतार तुटून पडली. यामुळे लागलेल्या आगीत या बसेस जळून खाक झाल्या.
 
 
जळगाव शहरापासून ३ कि.मी. अंतरावर दूरदर्शन टॉवरसमोर एक गॅरेज असून, तेथे खासगी प्रवासी बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. त्या जवळूनच गेलेली वीजतार रविवारी दुपारी अचानक तुटून एका बसवर पडली. तार तुटण्यापूर्वी स्पार्किंग झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तार तुटून बसवर पडल्यानंतर आणखी एकदा स्पार्किंग झाले आणि बसमधील सीटने पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप घेतले. जवळच उभ्या असलेल्या अन्य दोन बसदेखील पेटल्या. आगीमुळे टायरचा जोरदार स्फोट झाला. यामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली. या बसेस प्रसन्न यात्रा कंपनीच्या होत्या. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाल्या होत्या.
 
आ. हरिभाऊ जावळेंची तत्परता
आग लागली त्यावेळी तेथून आ. हरिभाऊ जावळे आपल्या वाहनाने जात होते. त्यांनी वाहन थांबवून घटनेची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना कळविली आणि मदतीसाठी पोलीस दल पाठविण्याची सूचना केली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आ. जावळे यांनी रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष हिरालालबापू चौधरी, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष विलासअप्पा चौधरी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@