होमियोपॅथी बद्दलचे समज-गैरसमज- १०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |

 

 
 
 
होमियोपॅथीची औषधे ही जरी चवीला गोड असली तरी सुध्दा लॅक्सेज पासुन बनवलेली असतात व जर मोजयचेच झाले तर एक दिवसात आपण जी होमियोपॅथीची औषधे घेते त्यातील साखरेचे प्रमाण हे अत्यंत अल्प असे असते 
 

होमियोपॅथी औषधे सुरु करताना बऱ्याच शंका काही रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना असतात. यापैकी बऱ्याच शंका व गैरसमजुतींचे निरसन आपण मागील काही भागामध्ये केले आहे, आजच्या भागातही आपण अजून काही शंकाचे निरसन करणार आहोत. औषधे चालु करताना  असा प्रश्‍न पडतो की आधी चालु असलेली सर्व औषधे थांबवावी का? तर याचे उत्तर आपण पाहू. जे रुग्ण इतर औषधांवर अनेक वर्षे असतात त्यांची ती औषधे जर आपण एकाएकी बंद केली तर त्यांना withdrawl म्हणजेच औषधे प्रतिबंधीत केल्यामुळे होणारी लक्षणे दिसू लागतात. व त्यामुळे रुग्णाला त्रास होतो. अशावेळी ही औषधे टप्प्या टप्प्याने कमी करावी लागतात.

 

तसेच जे रुग्ण मधुमेह, उच्चरक्‍तदाब किंवा थायरॉईड जुना संधीवात अशा आजारांसाठी औषधे घेत असतात त्यांची ही औषधे ही एकदम बंद करुन चालत नाही तर ती टप्प्या टप्प्यानेच कमी करुन मग बंद करता येतात कारण हे आजार जुनाट असतात व अशा आजारांमध्ये अचानकपणे जुनी व चालु औषधे बंद करणे म्हणजे पायाने अपंग माणसाच्या कुबडया अचानकपणे काढून घेण्यासारखे आहे. सुरुवातीला दोन्ही औषधे चालु ठेउन मग जुनी औषधांची मात्रा कमी करता येते. परंतु बाकीच्या सर्व आजारांमध्ये जुनी किंवा आधी चालु असलेली सर्व औषधे ही लगेच बंद करता येतात त्याचप्रमाणे काही रुग्ण हे आधी काहीही औषधे जर घेत नसतील तर त्यांना पूर्णतः होमियोपॅथीच्या औषधांवर ठेवता येते व इतर कुठलीही औषधे चालुकरण्याची गरज लागत नाही.  दुसरी एका शंका असते ती म्हणजे मधुमेह किंवा डायबिटिस या आजाराबाबत रुग्णांना नेहमी एक शंका असते की होमियोपॅथीची औषधे ही गोड असतात मग ही औषधे डायबिटीसच्या रुग्णांना चालतील का? तर याचे उत्तर हो असेच आहे.

 
 

चपातीच्या एका घासात जितकी साखर असते तितकांच साखर ही पूर्ण एक दिवसाच्या मात्रेत असते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णंना पण होमियोपॅथीची औषधे विनासायास व बिनधास्तपण घेता येतात होमियोपॅथीची औषधे सेवन केल्यांनतर १० ते १५ मिनिटे काही करु नये असे नेहमी तज्ञांकडून सांगण्यात येते. हे असे का याची शंका अनेक लोकांना येते त्याचे उत्तर असे की होमियोपॅथीक औषध जेव्हा तोंडात टाकले जाते तेव्हा ते तोंडाच्या आतील भागातून शरीरात शोषली जातात जेव्हा तोंडात अगोदरच काही पदार्थ असतील तर त्यांचा उग्रवासही तोंडात असतो अशावेळी होमियोपॅथीची औषधे शोषली जाण्यास अडथळा येउ शकतो त्यामुळेच तोंड स्वच्छ व ताजेतवाने असताताच औषधे घेण्याचा सल्‍ला दिला जातो त्याचबरोबर औषधे घेतल्या नंतरही दहा ते पंधरा मिनीटे काही खाण्याचे टाळावे कारण त्या काळात औषधे शरीरात शोषली जातात.

 

औषधे घेतल्या नंतर कधी कधी जर तहान लागली असेल तर पाणी पिण्यास हरकत नाही. पण जर शक्य असेल तर १० ते १५ मिनिटे काही खाउ अगर पिउ नये होमियोपॅथी बद्दलचे गैरसमज लोकांच्या मनात पुष्काळ आहेत व त्यामुळेच बरेचसे लोक ही अत्यंत गुणकारी औषधप्रणाली घेत नाहीत. परंतु आता हे चित्र पालखे आहे व होमियोपॅथीकडे वळून संपूर्णपणे निरोगी होणारया लोकांची संख्या विलक्षणरीत्या वाढली आहे व झपाटयाने वाढतच आहे पुढील भागात आपण होमियोपॅथीबद्दल अजून काही माहिती जाणून घेउया.

-डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@