अभ्यंग आचरेत् नित्यम् भाग-५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |


 
काही विशिष्ट आजारांमध्ये तेलाऐवजी औषधी काढ्यांमध्ये आणि सौंदर्यवर्धनासाठी दुधात अन्य औषधी घटक घालूनही अवगाह स्नान केले जाते.
 

या लेखमालेतून अभ्यंगाचे विविध पैलू आपण पाहत आहोत. आयुर्वेदात काही नित्य उपक्रम, काही रोजचे विधी सांगितले आहेत. त्यातीलच अभ्यंग ही एक दिनचर्या (रोज करण्याची चर्या/विधी) आहे. अभि + अंग शरीरावर अजून एक अंग (आवरण) चढवणे म्हणजे ‘अभ्यंग’ होय. त्वचेवर संरक्षणार्थ तसेच आरोग्यदायी कवच अभ्यंगामुळे प्राप्त होते. प्राचीन काळापासून अभ्यंग स्नान हीच प्रथा आपल्याकडे रूढ झाली होती, ज्याचा विसर हल्‍ली पडत चालला आहे. ते संपूर्णपणे कालबाह्य होऊ नये, याची काळजीही आपणच घ्यायला हवी.

 

अभ्यंग म्हणजे बाह्य (शरीराला वरून लावणे) स्नेहनाचा प्रकार आहे. बाह्य स्नेहनाचे एकूण तीन प्रकार आहेत. अभ्यंग, अवगाह आणि परिषेक. अवगाह म्हणजे Oil Bath. Tub bath घेणे. ज्यात तेलात बसवले जाते, त्याला ‘अवगाह’ म्हटले जाते. अत्यंत रुक्षता, कोरडेपणा, काठिण्य इ. अवस्थेत अवगाहचा वापर होतो. संपूर्ण शरीरावर स्नेहाचा (तेल किंवा तुपाचा) सतत संपर्क अवगाहमध्ये राहतो. शरीरावर त्वचेतील रोमरंध्रांमधून (Hair Follicles) हे तेल शरीरात थोडे शोषले जाते. जसे चामडे कडक आणि उत्तम प्रतीचे करण्यासाठी ते तेलात/स्नेहात बुडवून ठेवले जाते, तसाच परिणाम मनुष्य त्वचेवर अवगाह स्नेहाचा होतो. विविध वाताच्या तक्रारींमध्ये विशिष्ट अंग-अवयवाला तेलामध्ये बुडवून ठेवतात किंवा त्या अवयवावर तेल साठवून ठेवले जाते. अवगाह संपूर्ण शरीरासाठी सांगितला आहे. जानुबस्ती (गुडघ्यावर तेल साठवून ठेवणे), कटिबस्ती (कंबरेवर तेल साठविणे), मन्याबस्ती (मानेवर तेल धारण करणे) इ. चिकित्सा प्रकार या अवगाह तत्त्वावरच आधारित आहेत. परिषेक म्हणजे धारा. शंकराच्या पिंडीवर जशी संथ सतत पाण्याची किंवा दुधाची धार सोडली जाते, त्याच पद्धतीने शरीरावर संथ तेलाची धार सोडणे म्हणजे ‘परिषेक’ होय. परिषेकाला ’धारा’ हा पर्यायी शब्दही वापरला जातो. ’शिरोधारा’ हा शब्द अधिक प्रचलित आहे. विविध स्पा आणि अन्य आरोग्य केंद्राच्या जाहिरातींमध्ये एक महिला शांत झोपलेली आणि तिच्या कपाळावर/डोक्यावर सतत धारा सोडलेली, हे चित्र लावलेले असते. हे चित्र बघताच याने आराम मिळतो, हे जाणवते. परिषेकामध्ये शांतता आणि आरामदायी भावना नक्कीच येते, पण त्याचबरोबर शरीरातील रक्तप्रवाह आणि स्पर्शज्ञान संवाद ही सुधारते. विशिष्ट व्याधींमध्ये शरीराच्या ठराविक अवयवांवर परिषेक केला जातो. मानसिक अस्वस्थता, अनिद्रा, ताण, चिंता इ. अनेक लक्षणांमध्ये औषधी सिद्ध तेलाची शिरोधारा अति उपयोगी आहे. तसेच डोक्यातील खवडा (Dandruff), खाज, दाह कमी करण्यासाठीही विविध औषधी काढ्यांची, सिद्ध ताकांची ‘तक्रधारा’ ही केली जाते. म्हणजे स्नेहनाचा एक प्रकार म्हणून ‘परिषेक’ तर आहेच, पण त्याचबरोबर काढे व ताकाची दोषांनुसार आणि रोगांनुसार ‘परिषेक’ केला जातो.

 

विविध तेलांचा अभ्यंगासाठी कसा फायदा होतो, त्याचे गुणधर्म काय हे आपण मागील लेखात पाहिले. तसेच शरीराच्या कुठल्या भागाला अभ्यंग केला जातो, त्यावरही काही तेलांचा वापर ठरविला जातो. जसे संपूर्ण शरीराच्या अभ्यंगासाठी तिळतेल, ऑलिव्ह तेल, सूर्यफुलाचे तेल, मोहरीचे तेल, मक्याचे तेल, खोबरेल तेल यापैकी ऋतुनुसार आणि प्रकृतीनुसार कुठलेही तेल निवडून वापरले तर चालते. शिरोभ्यंग साठी खूप उष्णतावर्धक आणि तीव्र वासांची (मोहरीचे, सूर्यफुलाचे तेल इ.) वापरले जात नाही. ही तेले टाळावीत. डोक्यासाठी आणि डोक्यावरील केसांसाठीही खोबरेल तेल उत्तम. तसेच शीतगुणी औषधांनी सिद्ध तिळतेलही शिरोभ्यंगाला उपयोगी आहे. तसेच पादाभ्यंगासाठी यापैकी एखादे तेल किंवा औषधी तूपही (किंवा साधे तूप) लावले तरी चालेल.

 

हल्ली बाजारात नवनवीन तेलाचे प्रकार उपलब्ध होतात. Virgin Olive Oil, Cold Pressed Oils, Scented Oils, Aroma Oils इ. देखील वापरायला हरकत नाही. पण आधी patchtestशरीराच्या छोट्याशा एका भागाला तेल लावावे.) म्हणजेच त्वचेवर पुरळ, खाज, लालिमा, सूज ही काही अश्रश्रशीसळल ठशरलींळेप तर होत नाही ना, हे एक-दोन दिवस लावून पाहावे आणि नंतर सर्वांगाला किंवा पादाभ्यंगासाठी वापरावे. Jojoba Oil, Apricot Oil, Olive Oil, Almond Oil, Wheat Germ Oil इ. तेलाचा वापर नित्य दिनचर्येतील अभ्यंगासाठी गरजेचा नाहीत. रिलॅक्सेशन आणि त्वचा सौंदर्यवर्धन यासाठी वरील तेलांचा उपयोग अधिक आहे. अभ्यंग हा केवळ सौंदर्यासाठी सांगितलेला नाही. त्याचे विविध फायदे आपण आधीच्या लेखांमधून वाचले आहेतच.

 

प्रकृतीनुरूप तेलाची निवड करणे अधिक फलदायी सिद्ध होते. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी तिळाचे तेल, एरंडेल, ऑलिव्ह ऑईल यापैकी निवडावे व वापरावे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी खोबरेल तेल किंवा तूप लावावे. अन्य तेलांनी शरीरात उष्णता वाढून पुरळ येण्याची शक्यता वाढते. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी मोहरीचे तेल, तिळाचे तेल, मक्याचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरावे. पण, ऋतुमानानुसार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार यात बदल करावा.

 

अभ्यंग कधी करू नये? याचेही शास्त्रात वर्णन आहे. काही विशिष्ट आजार असतेवेळी अभ्यंग करू नये. जसे- ताप, अजीर्ण, अग्निमांद्य, कफाचा अति उद्रेक, पंचकर्मातील कर्म झाल्या झाल्या लगेच, मासिक स्राव सुरू असतेवेळी, शरीरात आमता (अपचनामुळे शरीरात निर्माण होणारे ’ढेुळपी’) अति मद्यपान केल्यानंतर अति मानसिक ताण, डिहायड्रेशन झाले असताना इ. वेळी, लक्षणे, त्रास, परिस्थिती असताना अभ्यंग करू नये, असे शास्त्रकार सांगतात.

 

अभ्यंग हे स्वतःच्या हाताने शरीरावर तेल लावून हलके चोळणे याला म्हणतात. यात संवाहन अपेक्षित आहे. अभ्यंगाप्रमाणेच अजून एक प्रकार आयुर्वेदात सांगितला आहे, तो म्हणजे मर्दन. मर्दन म्हणजे रगडणे. यात (जोर) अधिक लावला जातो. मर्दन हे स्वतः करणे जरा कठीण जाते. ते इतरांकडून करून घेतले जाते. यात (दाबणे, चोळणे) पण नित्य उपक्रमात मर्दन अपेक्षित नाही. अभ्यंग हा दैनंदिन जीवनातील नित्य उपक्रम आहे. जसे रोज दात घासले जातात, आंघोळ केली जाते, तसेच रोज अभ्यंगही करावे.

 

पुढील लेखात आयुर्वेदापेक्षा वेगळे जे विविध मसाजचे प्रकार आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.

क्रमशः

-वैद्य कीर्ती देव

@@AUTHORINFO_V1@@