गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कर महसूलात ३९ टक्क्यांची वाढ - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
ई-वे बिलाची मर्यादा ५० हजार रुपयांहून १ लाख रुपये


राज्यात ई-वे बिलाची मर्यादा ५० हजार रुपयांहून १ लाख रुपये केल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
 
आज वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, राहूल नार्वेकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई क्षेत्राच्या मुख्य आयुक्त संगिता शर्मा, आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह उद्योग- व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर, केंद्र आणि राज्य शासनाचे वस्तू व सेवा कर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
 
 
राज्यातील व्यापारी-उद्योजक आणि वस्तू आणि सेवा कर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून ही कर प्रणाली राज्यात यशस्वीपणे राबविता आल्याचे सांगून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गत वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत चालू वित्तीय वर्षात जीएसटी कर महसूलात ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
 
 
कर भरतांना सुलभता आणि सहजता दिली तर लोक- उद्योजक व्यापारी कर भरतात याचे उत्तम उदाहरण या वाढलेल्या कर महसूलातून दिसून येते असे सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जीएसटीचीच्या अंमलबजावणीमुळे देश खऱ्याअर्थाने आर्थिक स्वातंत्र्य उपभोगतो आहे. ही कर प्रणाली निश्चित करतांना गुणवत्तेच्या आधारे एकमताने सर्व निर्णय घेण्यात आले, सर्वांच्या सहकार्यातून हा सहज आणि सुलभ कायदा करता आला ज्यातून देश आता आर्थिक विकासात वेगाने पुढे जात आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@