दूध दरवाढ आंदोलन : प्रमुख शहरांमध्ये दूध कोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |



पुणे  : दूधाला दरवाढ मिळावी, यासाठी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी राज्यभर पुकारलेल्या दरवाढ आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सलग चार दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले असून पुणे-मुंबईसह शहरांना आता याचा फटका बसू लागला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये आंदोलनामुळे कमी झालेल्या दुध संकलनामुळे शहरांमधील दुध वितरणावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आता दुध कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

 
विशेषतः पुणे शहराला या दुध कोंडीचा जास्त फटका बसत आहे. पुण्यातील अनेक महत्त्वाच्या दुध डेअरींमधील दुध संकलन घटल्यामुळे आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यातील प्रसिद्ध 'चितळे' डेअरीने आज दुधाच्या तुटवड्यामुळे आपले वितरण बंद ठेवले आहे. त्यामुळे पुणेकरांवर कोराच चहा पिण्याची वेळ आली आहे.



दरम्यान आंदोलकांच्या हिंसक कारवाया अजून देखील सुरूच आहे. काल मध्यरात्री पुण्याच्या दिशेने येत असलेले दुधाचे एक वाहन आंदोलकांनी वाटेत अडवून त्याची तोडफोड केली. तसेच गाडीतील दुधाच्या सर्व पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या. यामुळे शेकडो लिटर दुध वाया गेले आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील इतर ठिकाणी देखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या शहरांना दुध पुरवठा करण्यात अडथळा निर्माण होऊ लागला आहे.


राजू शेट्टी यांची दोन पाऊले मागे येण्याची तयारी ?

दरम्यान नागरिकांचे होणारे हाल पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दोन पाऊले मागे येण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे. सरकारने जरी दरवाढ नाही दिली तरी दुध भुकटी प्लांटचालकांनी शेतकऱ्यांचे दुध २५ रुपयांनी खरेदी करावे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. जेणेकरून दुधसंघ हे आपोआपच दुधाला जास्त दर देतील. परंतु याविषयी ठोस माहिती मात्र अजून समोर आलेली नाही..

@@AUTHORINFO_V1@@