पुणेकरांना आज चितळेंचे दुध नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |

दूध संकलन घटल्यामुळे दूध वितरणावर परिमाण 






पुणे : गेल्या चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाचा फटका आता सामान्य पुणेकरांना बसू लागला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये दुधाचे संकलन घटल्यामुळे पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध 'चितळे डेअरी'चे दुध आज पुणेकरांना उपलब्ध होऊ शकणार नाही. यासंबंधी स्वतः चितळेंकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना आज कोरा चहाच प्यावा लागणार आहे.


आज सकाळीच चितळेंनी याविषयी माहिती दिली आहे. आपल्या सोशल मिडीयावरून ही माहिती नागरिकांना देत, गेल्या चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या आंदोलनामुळे दिनांक १९ जुलैला चितळेंचे दुध उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे चितळेंकडून सांगण्यात आले आहे. तसेच यामुळे सामान्य पुणेकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल देखील डेअरीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.





दूधाला दरवाढ देण्यात यावी, यासाठी गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राजभर आंदोलन सुरु केले आहे. त्यातच स्वभिमानीच्या हिंसक कारवायांमुळे राज्यातील दुध संकलन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. चितळे डेअरीकडून पुण्यात दररोज जवळजवळ साडे चार लाख लिटरहून अधिक दुधाचे वितरण होते. परंतु दूध संकलन घटल्यामुळे त्याच्या वितरणावर परिणाम झाला आहे. चितळेंबरोबर कात्रज, गोकुळ आणि इतर डेअरींचे दूध देखील उपलब्ध होण्यास अडथळा होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@