संजय घरत प्रकरणात आणखी काही अधिकारी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |



कल्याण : कडोंमपाचे निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून आयुक्त गोविंद बोडके आणि सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट, ई-प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड यांचाही जबाब मंगळवारी या विभागाने नोंदवून घेतला.

 

अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी घरत आणि त्यांचे दोन लिपिक भूषण पाटील, ललित आमरे या दोघांना आठ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १३ जूनला अटक केली होती. या प्रकरणात संजय घरत यांना महापालिका सेवेतून निलंबितही करण्यात आले आहे, परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. घरत यांच्या मालमत्तेसंदर्भातील तक्रारीची लाचलुचपत विभागाकडून चौकशी यापूर्वीच करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्या कार्यालयात काम करणार्या कर्मचार्यांचेही जबाब नोंदवून घेऊन या प्रकरणी आणखी काही अधिकारी आहेत का, याची चौकशी करण्यात आली.

 

दरम्यान, घरत यांचे निलंबन कायम करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या कडोंमपाच्या महासभेत प्रशासनाकडून दाखल करण्यात आला होता. मात्र या सभेदरम्यान झालेल्या गोंधळात महासभा होऊ शकली नाही आणि आता त्या ठरावाला विलंब लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

@@AUTHORINFO_V1@@