बदलापूर रेल्वेस्थानकाच्या पुलाची दुरुस्ती सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |



बदलापूर: बदलापूर रेल्वेस्थानकात मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. अंधेरी येथे नुकत्याच झालेल्या पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने सर्व पुलांचे ऑडिट केले होते, त्यात बदलापूर येथील पादचारी पूल जीर्ण झाला असून त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचे मत सर्वेक्षण समितीने सुचवले होते. पावसाळ्यापूर्वीच डागडुजी करणे आवश्यक असल्याचेही सुचवण्यात आले होते.

 

बदलापुरातील रेल्वे प्रवासी विविध संघटना, राजकीय पक्ष यांनीदेखील जीर्ण झालेल्या पादचारी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी लावून धरली होती. काही रेल्वे स्थानकात सर्वेक्षणाचे सुरू असताना बदलापुरात मात्र रेल्वे प्रशासनाने डागडुजीच्या कामाला सुरुवातही केली आहे.

 

मध्यभागी असलेल्या या पुलाची डागडुजी होत असली तरी कर्जत दिशेला एक नवीन पूल उभारावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून होत आहे. तसेच रेल्वे फलाटाच्या बाहेर असलेल्या मच्छी मार्केट येथील पुलाच्या डागडुजीसाठी बदलापूर नगरपरिषदेने रेल्वे प्रशासनाकडे निधी सुपूर्द केला असून त्या पुलाची डागडुजी लवकरात लवकर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

@@AUTHORINFO_V1@@