आरबीआयकडून १०० रुपयाच्या नोटेचा फोटो जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |
 

 
 
 
नवी दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून आज १०० ची नवी नोट जाहीर करण्यात आली आहे. फिका जांभळा म्हणजेच ‘लॅव्हेंडर’ रंगात ही नवी नोट बाजारात येणार आहे. अतिशय मनमोहक अशी ही १०० ची नोट लवकरच भारतीय चलनात आपल्याला दिसणार आहे. ६६ मिमी × १४२ मि.मी. आकाराची ही नोट नुकतीच आरबीआयकडून जाहीर करण्यात आली आहे. 
 
 
 
 
 
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नोटवर असून पुढील भागावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र आणि मागील भागात ‘रानी की वाव’ या भौमितीय नमुन्याची प्रतिमा आहे. या नोटेवर ‘स्वच्छ भारत’चे प्रतिक असून भाषांचा देखील वापर यात करण्यात आला आहे. अशोक स्तंभ देखील या नोटेवर दाखवण्यात आला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@