नरेंद्र मोदी यांनी आमच्या जीवनात प्रकाश आणला – काश्मिरी मुलगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या जीवनात प्रकाश आणला आहे असे निरागस बोल काश्मीरची एक छोटीसी मुलगी आरती हिने नरेंद्र मोदी यांच्याबद्दल उद्गारले आहे. आज नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काश्मीरमधील नागरिकांशी संवाद साधत असतांना काश्मीरच्या आरती नावाच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 
 
 
 
 
आमच्या घरात आधी वीज नव्हती त्यामुळे आम्हाला काही आणायचे असेल तर ३० किलोमीटर प्रवास करून आणावे लागत असे मात्र आता आमच्या गावात वीज आली असून त्यामुळे आता आम्ही अभ्यास करू शकतो तसेच आता रात्री आम्हाला भीती वाटत नाही असे आरतीने नरेंद्र मोदी यांना यावेळी सांगितले. हा सगळं चमत्कार नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला असून जमिनीवर तारे उतरले आहे असे आम्हाला वाटत आहे असे निरागस बोल या मुलीने यावेळी नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडले. 
 
 
 
आरतीच्या गावात वीज पोहोचवली यासाठी नरेंद्र मोदी यांचे यावेळी आरतीने आभार मानले असून यावेळी तिने त्यांच्यावर एक शायरी देखील म्हणून दाखविली. अतिशय कौतुकाने नरेंद्र मोदी यांनी देखील तिचा आत्मविश्वास वाढवला आणि तिला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होतांना दिसत आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@